शिवसेना अशी तळ्यात मळ्यात का आहे ? ही आहेत कारणे

By | September 19, 2017

मुंबई : पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.मात्र काय कारण आहे कि शिवसेना फक्त पोकळ धमक्या देतेय पण प्रत्यक्षात काहीच कृती करत नाही .. तर चला जाणून घेऊया शिवसेनेच्या या तळ्यात मळ्यात भूमिकेबद्दल .
सत्तेत राहावे कि बाहेर पडावे याबद्दल शिवसेना आमदारांमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे.

एकूण ६३ पैकी २५ आमदारांना सत्ता सोडण्याचा निर्णय अजिबात मान्य नसून त्यांनी पक्षप्रमुखांना तसं स्पष्टपणे सांगितल्याचं कळतं. त्यामुळे शिवसेना सत्तेतून पडली तर त्यांना हे २५ आमदार गमवावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेतील आतील धुसफूस पुन्हा एकदा बाहेर आली. ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत दोन वेळा खडाजंगी झाली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर असताना हा सर्व प्रकार घडलाय.

सत्तेतून बाहेर पडण्यावरुन ‘मातोश्री’वरील बैठकीत गटबाजीचं राजकारण दिसून आलं. मध्यावधी झाल्यास निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असं पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेना घेईन अशी चिन्हे फार कमी आहेत मात्र तसं झालंच तर शिवसेनेचे बरेच आमदार शिवसेनेमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
@@पोस्ट आवडली असेल तर लाईक करा .शेअर करा @@

Leave a Reply