मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित ‘ सात ‘ माहित नसलेल्या गोष्टी

By | September 26, 2017

manmohan singh

मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित सात ‘माहित नसलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या मुलीने आपल्या पुस्तकात सांगितल्या आहेत. मनमोहन सिंह यांच्या कन्या दमन सिंह यांनी ‘स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन एंड गुरुशरण’ यात त्या सांगितल्या आहेत.

१) मनमोहन सिंग यांच्या वडिलांची इच्छा होती कि मनमोहन सिंग यांनी डॉक्टर बनावे .. मनमोहन सिंग यांनी ऍडमिशन घेतले सुद्धा होते पण पुढे त्यांचे मेडिकल शिक्षणात मन रमले नाही म्हणून त्यांनी कॉलेज सोडून दिले.

२) मनमोहन सिंग यांनी शिक्षण सोडल्यानंतर वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले पण वडिल्यांच्या व्यवसायात देखील त्यांना लहान सहन कामेच करावी लागायची म्हणून त्यांचे मन इथेही रमले नाही . त्यांनी परत शिक्षणाचा निर्णय घेतला व १९४८ ला हिंदू कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले .

३) मनमोहन सिंग यांना विज्ञानात पहिल्यापासूनच रस नव्हता .. मात्र एखादा देश गरीब का असतो आणि एखादा देश श्रीमंत का असतो याची कारणे जाणून घेणे याचे प्रचंड कुतूहल होते , त्यामुळे त्यांनी अर्थशास्राची निवड केली

४) पुढे शिकण्यासाठी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गेल्यानंतर प्रचंड आर्थिक तंगीचा सामना करावा लागला . राहण्याचा व शिक्षणाचा खर्च साधारण ६०० पाउंड होता,परंतु स्कॉलरशिप मध्ये त्यांना फक्त १५० पाउंड मिळत असत . त्यामुळे कित्येक वेळा उपाशी राहण्याची सुद्धा वेळ येत असे.

५) शिकण्यासाठी त्यांनी एका मित्राला २५ पाउंड उसने मागितले होते पण मित्राने ३ पाऊंड दिले होते.

६) आपल्या मनातील त्यांची इमेज अशी शांत आणि अबोल अशी असली तरी घरी आणि मित्रांच्यामध्ये ते भरपूर विनोद करतात आणि व्यक्तींना निकनेम द्यायला त्यांना फार आवडते . त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांना त्यांनी गुरुदेव हे नाव दिले आहे .

७) मनमोहन सिंग यांना घरचे कोणतेच काम करता येत नाही . अंडी उकडण्यापासून तर टी.व्ही. चालू करणे सुद्धा मनमोहन सिंग यांना येत नाही .

‘स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन एंड गुरुशरण’ यांच्या पुस्तकातून साभार

?? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा ??