ट्विटरच्या चिमणीचं क्रांतिकारी पाऊल..देणार फेसबुकला टक्कर

By | September 27, 2017

ट्विटरवरील शब्दमर्यादेमुळे अनेक जणांना ट्विटर चा वापर करण्यात अडचणी येतात . आपले म्हणणे १४० अक्षरमर्यादेत कसे लिहावे याचा विचार करण्यातच वेळ खर्च होतो . हे लक्षात घेऊन ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटकडून संदेशांसाठीची अक्षरमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र सुरुवातीला फक्त प्रायोगिक तत्त्वावर २८० अक्षरांची ट्विट करता येणार आहेत.

काही महिन्यांपुर्वीच ट्विटरकडून संदेशांसाठीची अक्षरमर्यादा १४० पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, फेसबुक मेसेंजरसारख्या स्पर्धकांचा विचार करता ट्विटर आता २८० शब्दांचे संदेश लिहण्याची सुविधा उपलब्ध करून स्वतःमध्ये थोडा बदल करतेय असं समजायला हरकत नाही .

सध्या ट्विटरवरील १४० अक्षरांची मर्यादा अनेकांसाठी अडचणीची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून अक्षरमर्यादा दुपटीने म्हणजे २८० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांच्याकडून २४० अक्षरांचे पहिले ट्विट करण्यात आले. ‘हा बदल लहानसा आहे, पण आमच्यासाठी खूप मोठे पाऊल आहे. यापूर्वी ट्विटसाठी १४० शब्दांची तांत्रिक मर्यादा होती. लोकांना ट्विट करताना येणाऱ्या खऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमच्या टीमने विचारपूर्वक जे बदल केले आहेत, त्याचा अभिमान वाटतो’, असे डोर्सी यांनी ट्विटमध्ये लिहले आहे. परंतु, सुरूवातीला निवडक युजर्सनाच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मग सर्वासाठी ही सुविधा उपलब्ध असेल असे सांगण्यात आले.

फेसबुक मॅसेंजरवर सध्या २० हजार शब्दांचा संदेश पाठविण्याची व्यवस्था आहे, त्या तुलनेत ट्विटर कुठंच नव्हतं म्हणून या माध्यमातून ट्विटर फेसबुक मॅसेंजरची स्पर्धा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असे असं म्हटलं जातंय ..

@@पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा @@