टायगर श्रॉफ व दिशा पटनीला बघायला पुणेकर युवा वृंदाची तुफान गर्दी

By | September 23, 2017

साजिद नाडियादवाला यांच्या आगामी चित्रपट बागी २ च्या शूटिंगला पुण्यात सुरवात झाली. २०१६ मध्ये ‘बागी’ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता आणि आता ह्या चित्रपटाचा दुसरा पार्ट म्हणजे बागी २ च्या शूटिंगला पुणे येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात सुरवात झाली आहे.

यावेळी समस्त पुणेकर युवावर्गाने टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीला पाहण्यास महाविद्यालय परिसरात गर्दी केली होती.

‘बागी २’ एक अॅक्शन फिल्म असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ आणि दिशा पटणी दिसतील.अल्पावधीतच या जोडीने युवावर्गात आपले स्थान निर्माण केल्याचे दिसून आले.कॅडबरी च्या जाहिरातींपासून ते बागी २ पर्यंतचा दिशा पटनी चा प्रवास तास सुपरफास्टच राहिला आहे .

‘बागी २’ २७ एप्रिल २०१८ रोजी रिलीज होणार आहे. साजिद नाडियादवाला यांच्या चित्रपटात बॉलिवूडमध्ये ह्याआधी कधी न पाहिलेले एक्शन सिन बघायला मिळतील.