पुढील २४ तास काय सांगतोय पावसाचा अंदाज ?

By | September 20, 2017

heavy raining

मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा धुवाधार पाऊस बरसला. पावसाचे रौद्ररूप पाहून २९ आॅगस्टसारखी स्थिती पुन्हा निर्माण होते की काय,अशी परिस्थिति निर्माण झाली आहे . मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी संध्याकाळी सहावाजेपर्यंत राहणार बंद राहणार आहे. मुंबई, कोकण व मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे

मुंबईतून 50 उड्डाणे रद्द झाल्यामुळे इंडिगो, स्पाईस जेट प्रवाशांना तिकीटाची सर्व रक्कम करणार परत करणार आहे. मुंबईत कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि मुख्य धावपट्टी बंद असल्याने हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवाई सेवेचे वेळापत्रक कोलमडले असून, सर्व प्रवाशांना एसएमएस, फोन, ई-मेलच्या माध्यमातून बदललेल्या वेळेची माहिती देण्यात येत असल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले. आतापर्यंत मुंबई शहरात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर, उपनगरात 303 मिमी पाऊस झाला आहे. डहाणूमध्ये 304 मिमी पाऊस कोसळला आहे.

कोकणातही अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या ७२ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.अरबी समुद्राहून वाहणारे वारे आणखी वेगाने वाहू लागले. पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरातून शहरात दाखल होणाºया पावसाने सर्वप्रथम बोरीवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, साकीनाका, पवई, मुलुंड, भांडुप, घाटकोपरसह वांद्रे-कुर्ला परिसराला झोडपून काढले.

काल दुपारी सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. काही लोकल रद्द झाल्या.अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि उपनगरातील सर्व शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासननं घेतला आहे. हा दिवस दिवाळीच्या सुटीत भरून काढण्यात येईल अशी घोषणा अखेर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. माणगाव खोºयातील आंबेरी येथील पुलावर पुराचे पाणी असल्याने २७ गावांचा संपर्क तुटला. मालवण तालुक्यातील मसुरे, बागायत, कावा या गावांतही पूरस्थिती आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे रायगडमध्ये सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्यांची पातळी वाढली आहे.येत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे . मुंबईत मुसळधार पाऊस पडेल.ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सत्रांतील विद्यार्थ्यांचे सायंकाळी घरी परतताना हाल झाले.पालघर जिल्ह्यातील टेम्भी गावात चक्रीवादळात सापडून किनाºयावर नांगरलेल्या ७ बोटी चिरल्या. बोटीचा भाग अंगावर पडल्याने संदीप तांडेल (५०) यांचा मृत्यू झाला.पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने उपनद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जळगावातील रावेर तसेच धुले जिल्ह्यातील साकरी,पिंपळनेर परिसरातहि जोरदार पाऊस सुरु आहे .पुणे,नगर व मराठवाड्यातही जोरदार पाऊस सुरु आहे .सगळा महाराष्ट्र आज पावसाने झोडपून काढला आहे

@@पोस्ट आवडली तर लाईक करायला विसरू नका @@@