पतंजली आणि मोबाईल टॉवरच्या नावाखाली अशी होऊ शकते तुमची फसवणूक : सत्यकथा

By | September 21, 2017

पतंजलीच्या उत्पादनाचा वितरक म्हणून नेमणूक करण्याचे आमिष दाखवून देशभरातील व्यापाऱ्यांची इंटरनेटच्या माध्यमातून लूट करणाऱ्या बिहारमधील टोळीच्या प्रमुखाला नगरच्या सायबर पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन अटक केली. त्याला दि. २८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
राहुरीतील देविदास हौशिनाथ दहिफळे (वय ४१) यांनी एका वेबसाईटवर पतंजलीच्या उत्पादनांसाठी वितरक नियुक्त करण्याची जाहिरात ३ ऑगस्टला वाचली, दहिफळे यांनी फोन केला असता,राघवेंद्रसिंग या व्यक्तीने पंजाब बँकेच्या खात्यावर २५ हजार २०० रुपये भरून नोंदणी करण्यास सांगितले. ते भरताच पुन्हा अनामत रक्कम म्हणून २ लाख ७५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. दहिफळे यांनी ते हि जमा केले. त्यानंतर दहिफळे यांना पतंजलीचे वितरक म्हणून नियुक्त केल्याचे प्रमाणपत्र मेलद्वारे पाठवण्यात आले.

परंतु विक्रीसाठी मालासाठी संपर्क करताच दहिफळे यांना राघवेंद्रसिंग याने १० लाख आगाऊ भरण्यास सांगितले. त्यामुळे दहिफळे यांना संशय आला पतंजली कंपनीकडे संपर्क केला तर ती वेब साईट पतंजलीची नाही, असे स्पष्ट करण्यात आले.ह्या टोळीने महाराष्ट्रात धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोला येथे तसेच तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी ठिकाणीही लोकांची फसवणूक केली आहे.केवळ पतंजलीच्या नावाखाली त्याच्या बँक खात्यात तब्बल ५० लाखांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

केवळ पतंजलीच्या उत्पादनाबाबतच नव्हे तर इंटरनेटच्या व पेपर च्या माध्यमातून एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीसाठी जमीन भाडय़ाने द्या व त्याबदल्यात ५ लाख रुपये अनामत व ५० हजार रुपये भाडे मिळवा अशाही अनेक जाहिराती अनेक नामांकित वृत्तपत्रांमधून येत असतात . अशा लोकांना जाहिरातीचा प्लॅटफॉर्म केवळ काही रुपयांसाठी देऊन नंतर परत त्यांच्या नावाने बोंबा ठोकण्याचे काम ही वृत्तपत्रे का करतात ? पेपर हे लोकांचा सर्वाधिक विश्वास असलेले माध्यम आहे. तरीही अशा चोर लोकांच्या जाहिराती देऊन आपण समाजाची फसवणूक का करतो आणि वरून समाजाला नैतिकतेचे धडे कोडगेपणाने का देतो, हा एक संशोधनाचा विषय आहे.

थोड्या फार फरकाने मैत्री क्लब, फ्रेंडशिप,मसाज पार्लर या गोंडस नावाखाली देखील अशीच फसवणूक केली जाते .. अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायाकडे ढकलले जाते. नंतर ब्लॅकमेल करून त्यांच्या आयुष्याचे वाटोळे केले जाते..असा हा दुटप्पीपणा ही वृत्तपत्रे का करतात ? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असा नालायक का वागतो ? आणि परत आपण ज्यांना प्लॅटफॉर्म दिला होता त्यांच्याच नावाने बोंबा ठोकताना इतका कोडगेपणा कुठून येतो ?

आता सर्वसामान्य नागरीकांनीच काळजी घेणे व कोणत्याही अमिषाला बळी न पडणे हेच आपल्या हातात आहे
@@पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा @@