मी सांगेन तीच हेअरस्टाइल नाहीतर चेहरा विद्रुप करण्यात येईल

By | September 21, 2017

north korea hair styles

सर्वसाधारणपणे आपण आपल्या चेहऱ्याला साजेशी अशी हेअर स्टाईल ठेवतो कि जेणेकरून आपण चारचौघात उठून दिसू .. परंतु ह्या देशातील राजाला ते मान्य नाहीये . मी सांगेन त्याच पद्धतने हेअर स्टाईल ठेवावी लागेल असा अजब गजब वटहुकूम निघतो आणि जनतेला निमूटपणे ते मान्य करावे लागते ..
२१ ह्या शतकात अशक्य वाटत असली तरी ही वस्तुस्तिथी आहे उत्तर कोरिया मधील..

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याच्या क्रूरतेच्या कथा प्रसिद्ध आहेत. संयुक्त राष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधांना न जुमानता त्याने अणवस्त्र चाचण्या सुरूच ठेवल्या आहेत. जपानवरून २ वेळा मिसाईल सोडले . त्याच्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या दरीत ढकलला जाईल अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्याच्या क्रौर्याच्या कथा ऐकून आपल्याच मनात या हुकूमशहाबद्दल एवढी दहशत निर्माण झालीय. आता या देशातील लोक कशा प्रकारे राहत असतील ? इथल्या नागरिकांना कोणतंही स्वातंत्र्य अनुभवता येत नाही, अगदी आपण कशा प्रकारे हेअरकट करावा हे देखील ठरवण्याचा अधिकार इथल्या नागरिकांना नाही.

महिला आणि पुरुषांना काही प्रकारचे सरकारी हेअरकटचे प्रकार ठरवून दिले आहेत. त्याच पद्धतीने केस कापण्याची सक्ती त्यांना आहे . पुरुषांना आणि महिलांना प्रत्येकी पंधरा हेअरकटचा पर्याय उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त दुसरा हेअरकट करण्याचा केला तर जेलमध्ये रवानगी केली जाते किंवा चेहरा विद्रुप केला जातो.

किम जाँग उन सारखी हेअर स्टाईल ठेवण्यास बंदी आहे. तशी हेअर स्टाईल ठेवल्यास चेहरा कायमस्वरूपी विद्रुप केला जातो आणि लोकांमध्ये दहशत पसरावी म्हणून अशा बातम्यांना पेपर मध्ये प्रसिद्धी देण्यात येते .