‘ह्या ‘ दुर्दैवी घटनेनंतर आली पालिकेला जाग

By | September 22, 2017

मुंबईमध्ये २९ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर डॉ. दीपक अमरापूरकर त्या दिवशी घरीच पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली. त्या दिवशी एल्फिन्स्टन जंक्शन परिसरात प्रचंड पाणी साचले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर डॉ. दीपक अमरापूरकर यांची छत्री एल्फिन्स्टन जंक्शन परिसरात सापडली,काही कालावधीनंतर वरळी समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सापडला.

बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या नंतर पालिकेला जाग आली आहे. आता पालिकेने परळ, एल्फिन्स्टन, शिवडी आणि आसपासच्या परिसरातील मॅनहोलची शोधमोहीम हाती घेतली आहे.

पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी, मलनि:सारण यासह विविध खासगी सेवा उपयोगिता कंपन्यांच्या मॅनहोलमध्ये एकसमानता असावी या दृष्टीने भविष्यात धोरण आखण्याचा विचार या शोधमोहिमेमागे आहे या करीत १८० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सध्या मॅनहोलची परीस्थिती काय आहे, मॅनहोलवर झाकणे आहेत की नाहीत,या दृष्टीने ही टीम काम करेल. पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी, मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे मुंबईत पसरले असून या वाहिन्यांवर मॅनहोल आहेत. मात्र काही ठिकाणी झाकणे तुटलेली आहेत तर काही ठिकाणी मॅनहोलवर झाकणेच नाहीत. आता पाहणीदरम्यान झाकण नसलेल्या मॅनहोल आढळले कि तात्काळ झाकण बसविण्यात येते.. पूर्वी मॅनहोलवरील लोखंडी झाकणे गर्दुल्ले आणि भुरटे चोर चोरत असत, त्यामुळे मॅनहोलवर लोखंडाऐवजी फायबरची झाकणे बसविण्यास सुरुवात झाली.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?