इम्रान खानची भारतात मुले आहेत तर स्वतः इम्रान खान समलैंगिक : पत्नीचे गंभीर आरोप

By | July 13, 2018

imran khans wife controversial statement

पाकिस्तानमधील राजकीय पक्ष पीटीआय (तहरीक ए इन्साफ) चा सर्वेसर्वा आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानची याची घटस्फोटित पत्नी रेहम हिने त्याच्याबद्दल अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे. रेहमने प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रात इम्रान खानचा रंगेलपणा आणि व्यसन यावर बोलून इम्रान खानची ईज्ज्जतच चव्हाट्यावर आणली असे म्हटले तरी वावगे ठरू नये अशा प्रकारे तिने इम्रानवर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार इम्रान खान याला अनैतिक संबंधातून भारतात देखील काही मुले झाली आहेत तसेच त्याला ड्रग्ज घेण्याची सवय देखील आहे .येत्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये निवडणूक होत आहे त्याच्या आधीच तिच्या ह्या आरोपांमुळे इम्रानच्या पक्षाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत .

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रेहमने असा दावा केला आहे की, इम्रान खानचे आयुष्य सेक्स, ड्रग्ज आणि रॉक अॅण्ड रोलने भरले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. इमरान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यास इच्छुक आहेत. त्यातच रेहमने हे पुस्तक प्रकाशित करुन खळबळ उडवून दिली आहे.. विरोधी पक्षांनी देखील याचे भांडवल करत इम्रान खान वर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

रेहमच्या पुस्तकाची विक्री गुरुवारपासून ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर होत आहे. या पुस्तकात रेहम हिने म्हटले आहे की, इम्रान खान कुराणाचे पठण करत नाही. काळ्या जादूवर विश्वास ठेवतो. तसेच, अनैतिक संबंधातून भारतीय मुलेही असल्याचे त्याने स्वत: मान्य केले आहे. रेहमने यापूर्वीही पुस्तकाच्या माध्यमातून इम्रान खानबाबत गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान समलैंगिक आहे. त्याने तिला त्याच्या मित्रांबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता. लग्नापूर्वी इम्रान खाने तिचा छळ केला होता, असा देखील गंभीर आरोप तिने केलेला आहे.