कीबोर्डच्या ‘ ह्या ‘ बटणाचा बिल गेट्स यांना होतोय पश्चाताप

By | September 23, 2017

जगभरात सर्वाधिक वापरले जाणा-या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंतांचा बादशाह बिल गेट्स यांना आजकाल एका गोष्टीचा पश्चाताप होतोय

ती गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर-लॅपटॉपच्या की-बोर्डवर असलेला एक ऑप्शन आहे. कंट्रोल+अल्ट+डिलीट हे तीन बटन एकत्र दाबल्यानंतर कॉम्प्युटर-लॅपटॉप रिस्टार्ट केले जाते, आता त्यात टास्क मॅनेजर हा ऑप्शन आला आहे. हाच तो ऑप्शन आता उतार वयात बिल गेट्सला यांना खटकतोय.

हावर्ड विद्यापीठात एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रासाठी अनेक अब्जोपतींसह उद्योगपतींना निमंत्रण देण्यात आलं होतं. बिल गेट्सही स्वतःच्या फाऊंडेशनचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान डेव्हिड ह्या व्यक्तीने यांनी बिल यांना प्रश्न विचारला, बिल, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, खरं तर हा प्रश्न मी आधीच विचारायला हवा होता. तुम्ही कॉम्प्युटर-लॅपटॉप रिस्टार्ट करण्यासाठी CTRL-Alt-Delete या तीन वेगवेगळ्या बटनांचा का वापर केला, त्यावर बिल यांनी डेव्हिड यांच्याकडे खंत व्यक्त केली.

यावर बिल गेट्स म्हणाले, कंट्रोल+अल्ट+डिलीट ही तीन बटने एकाच वेळी दाबून कॉम्प्युटर-लॅपटॉप रिस्टार्ट करण्याऐवजी त्यासाठी एकच बटन की-बोर्डवर द्यायला हवे होते. आयबीएम पीसी जेव्हा 1980 मध्ये पहिल्यांदा बनविण्यात आला तेव्हा या तीन बटनांचा वापर कॉम्प्युटर रिस्टार्ट करण्यासाठी केला गेला. पण त्यासाठी तीन बटने आणि दोन हात एवढा खटाटोप करावा लागतो. मी त्यावेळी सांगितले होते की यासाठी एकच बटन हवे, पण माझे त्यावेळी ऐकले नाही.आणि पुढे तशीच पद्धत रूढ झाली.

??पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ??