महागाईविरोधाच्या मोर्चात शिवसेनेने ‘ ह्या ‘ शब्दात गाठली अत्यंत हीन पातळी

By | September 23, 2017

मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली असून मुंबईत 12 ठिकाणी महागाईविरोधात मोर्चे काढण्यात आले . ज्या नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. ट्विट करून आशिष शेलार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

शिवसेनेने मात्र भाजपा सरकारविरोधात आक्रमक होताना अत्यंत खालची आणि हीन पातळी गाठली. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, निलम गोर्हे, किशोरी पेडणेकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला. नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय”, अशी घोषणाबाजी तर झालीच मात्र ”एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला”, अशा घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी अत्यंत खालची पातळी गाठल्याचे यावेळी पाहायला मिळालं,अर्थात वैयक्तिक रित्या एवढ्या खालच्या पातळीवर जाणे दुर्दैवी असल्याची जनसामान्यांकडून म्हटलं जातंय .

शिवसेनेच्या आंदोलनावर आशिष शेलार यांनी मात्र ट्विटरवरुन शिवसेनेला फैलावर घेतलं. जे मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवरही बसले तेच आज मोदींच्या विरोधात घोषणा देतात. ज्या माणसाच्या जिवंतपणी मृत्यूच्या घोषणा दिल्या जातात. तो दिर्घायुषी होतो, असं म्हणतात. पण नवरात्रीत ‘शिमगा’ करणाऱ्यांना आईभवानी विवेकबुद्धी दे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही बरसले. एकही निवडणूक लढवण्याची औकात नाही, अशांनी माझ्यासारख्या सातत्याने लोकांमधून निवडून आलेल्या लोक प्रतिनिधीवर बोलू नये, अशा शब्दात अनिल परब याना सुनावले.

दरम्यान, आशिष शेलार यांच्या या टीकेवर अनिल परब यांच्याशी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने संपर्क साधला असता त्यांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली ‘मातोश्री माझ्यासाठी मंदिर आहे. महापालिकेत एका मताने का होईना आम्ही जिंकलो. आम्ही आजपर्यंत कधीही खाल्ल्या ताटात घाण केली नाही . २०१४ मधील निवडणुकीपूर्वी शेलार तासनतास मातोश्रीबाहेर वाट बघत बसायचे हे विसरु नये, असं म्हणत अनिल परब यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा…. शेअर करा ?