आठवड्याचा खुराक ‘ हा ‘ पाकिस्तानी फक्त नाश्त्याला खातो

By | September 23, 2017

ह्या व्यक्तीला पाकिस्तानमध्ये ‘हलक’ म्हणून नाही तर ‘हल्क’ म्हणून ओळखल जातय. अर्बाब हयात असे त्याचे नाव असून तो जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानमधल्या या तरुणाने किशोरवयात असल्यापासून स्वत:चे शरीर कमावण्यात एवढी मेहनत घेतली की आता त्याला सारं जग पाकिस्तानचा ‘हल्क’ म्हणून ओळखू लागला.

जगात विविध प्रकारचे लोक आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व स्टाईल वेगवेगळी असते . आपली स्वतंत्र वेगळी ओळख असावी असं प्रत्येकालाच वाटतं आणि ही ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण स्वत:वर मेहनत घेत असतो.

अर्बाब हयात असे त्याचे नाव असून, तो जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचे वजन साडेचारशे किलोच्या आसपास आहे. त्याला हल्कबरोबर ‘खान बाबा’ या नावानेही ओळखलं जातं. एका हाताने माणासांना हवेत उचलणं, मोठय़ा गाडय़ा ओढणं अशी कामं तो अगदी हलक्या हातानं करतो.

.किशोरवयात असल्यापासून बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घेण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि तेव्हापासून त्याने शरीर कमवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याचा दिवसाचा खुराकही खूप जास्त आहे. तो न्याहरीत दररोज ३६ अंडी, ५ लिटर दूध आणि ३ किलो मांस खातो . विशेष म्हणजे याच वय २५ वर्षे आहे आणि वजन ४३५ किलो आहे .

? पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ?