सौदी अरेबिया सारख्या देशात महिलांनी ‘ हा ‘ हक्क मिळवून दाखवला

By | September 27, 2017

saudi arabia women driving permission

सौदी अरेबिया ह्या मुस्लिम देशामध्ये महिलांना खूपच दुय्यम वागणूक दिली जाते असे आपण आतापर्यंत वाचत, ऐकत आलो आहोत. पण आता आता सौदी अरेबियाने कट्टर विचारसरणी ला फाटा देत जगाचे कायदे कानून समजून घ्यायला सुरुवात केलीय असं म्हणावे लागेल .

सऊदी शाह सलमान यांनी एक वटहुकूम काढत आता यापुढे सौदी महिलांना गाडी चालवण्यास मुभा दिली आहे .यापूर्वी सौदी महिलांना गाडी चालवण्यास बंदी होती मात्र हा आदेश जून २०१८ पासून लागू होईल .

पूर्वापार पासून सौदी महिलांना गाडी चालवण्यास बंदी होतीच, मात्र १९९० ला खास कायदा आणून महिलांना गाडी चालवण्यापासून वंचित केलं गेलं. त्याला विरोध म्हणून ४७ महिलांनी मुद्दाम गाडी चालवून दाखवली, मात्र त्यांना अटक करून तुरुंगात टाकलं गेलं .

याही पुढे जाऊन हद्द म्हणजे, काही मुस्लिम विद्वानांनी महिलांनी गाडी चालवू नये असा एक फतवा काढला . महिलांनी गाडी चालवणे अशुभ आहे आणि यांनी त्यांचा पुरुषांशी संपर्क येऊ शकतो अशी कारणे दिली गेली . मात्र महिला त्यांच्या बाजूने ह्या न्याय असलेल्या हक्कासाठी लढत होत्या .

२०११ साली ‘वूमन टू ड्राइव्ह मोव्हमेन्ट’ या नावाने एक अभियान सुरु केले गेले . त्यात महिलांनी स्वतःचे गाडी चालवण्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकणे सुरु केले . २०११ ला सौदी अरब च्या शूरा प्रांताने ने एक रिपोर्ट जारी केला ,त्यात म्हटलं होत कि महिलांनी गाडी चालवली तर त्यांचा कौमार्यभंग होऊ शकतो .
मात्र महिलांचा संघर्ष थांबला नव्हता.. सौदी पुरुषांची मानसिकता देखील सरकारला अनुकूल अशीच होती. महिला आज गाडी चालवायला मागत आहेत , उद्या त्या त्यांच्या मनानेच कुठेही जाऊ लागतील, उद्या कमी कपडे घालण्याची देखील मागणी करू लागतील . सरकारचा हा निर्णय हा योग्य असल्याचे पुरुष म्हणत होते. मात्र महिलांचा संघर्ष चालूच होता

फेसबुक वर गाडी चालवण्याचे समर्थन करणारी पेजेस बनवली गेली. शेवटी 26 अक्टूबर 2013 ला एक अभियान सुरु केले गेले ज्यात ११ हजार महिला सहभागी झाल्या .सौदी अरब मधील सामाजिक कार्यकत्या लुजैन अल हथलौल याना १ डिसेम्बर २०१४ ला गाडी चालवण्याच्या आरोपावरून अटक केली गेली आणि तुरुंगात टाकले गेले . आतंकवादी खटले ज्या न्यायालयात चालवले जातात तिथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला .

हळूहळू त्यांना पुरुषांचे देखील समर्थन मिळू लागले यानंतर अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था,अमेन्स्टी कडून सौदी अरेबिया ला कडक शब्दात सुनावण्यात आले ,मग त्यांची सुटका करण्यात आली मात्र तोपर्यंत एक मोठे आंदोलन उभे राहिली होते आणि सरकारला विचार करून गाडी चालवणे हा मूलभूत अधिकार महिलांना देणे भाग पडले .गाडी चालवण्याचा हक्क मिळावा म्हणून आंदोलन करावे लागते यासारखी लाजिरवाणी दुसरी गोष्ट नाही . उशिरा का होईना पण सौदी सरकारला सदबुद्धी मिळाली असेच म्हणावे लागेल .

सलाम त्या महिलांना ज्या शेवटपर्यंत हरल्या नाहीत .. जुलमी राजवटीपासून आपला हक्क त्यांनी मिळून दाखवला .

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??