साईंच्या नगरीत आज होणार पहिल्या विमानाची चाचणी : कोण आहे पहिला प्रवासी ?

By | September 26, 2017

शिर्डी : अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर शिर्डीत आज मंगळवारी पहिल्या विमानाची चाचणी होणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास १ ऑक्टोबर ला राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण सोहळा होण्याची अपेक्षा आहे .

पालकमंत्री राम शिंदे हे शिर्डी विमानतळाचे पहिले प्रवासी ठरणार आहेत . दुपारी ३ वाजता पालकमंत्री मुंबईवरून विमानाने शिर्डीला येतील व त्यानंतर राष्ट्रपतींच्या दौऱ्याबद्दल बैठक करण्यात येईल.

विमानतळा साठी २७० कोटींचा खर्च आलेला असून हे विमानतळ महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले आहे. यात शिर्डी संस्थानने मोलाची कामगिरी बजावत ५० कोटी रुपये दिलेले आहेत .

या विमानतळावरून मुंबई, हैदराबाद व दिल्ली साठी लगेच सेवा सुरु होणार आहे .सुरवातीला सकाळ ते संध्याकाळ पर्यंत व नंतर मात्र २४ तास सेवा सुरु राहील . रोज कमीत कमी ५०० प्रवासी विमानाने येण्याचा अंदाज आहे तसेच या प्रवाश्याना शिर्डीच्या बोर्डिंग पास सोबत दर्शनासाठी व्ही.आय.पी. पास देखील देण्यात येणार आहे .

शिर्डीत विमानतळ व्हावे ही अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,देवेंद्र फडणवीस तसेच राधाकृष्ण विखे यांची मनापासून इच्छा होती, त्यांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे मुळेच हे शक्य झाले असे संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांनी सांगितले .

?? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ??