शिवसेनेचा सत्तात्याग हाच एक मोठा विनोद

By | September 21, 2017

सत्तेत सहभागी असलेली शिवसेना ही नेहमी सत्तेतून बाहेर पडतो असे धमकावत असते.

सेना सत्तेत राहून कायम भाजप सोबत भांडत असते . सेनेची ही धमकी म्हणजे एक प्रकारचा विनोदच आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे.मात्र नारायण राणे यांच्याबाबत त्यांनी काही न बोलणे पसंत केले .

राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे या पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयातील एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. हा कार्यक्रम झाल्यावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.या वेळी पुढे बोलताना खा. सुळे म्हणाल्या की , राज्यातील शिवसेना नेहमीच काही ना काही कारणावरून भांडत असते. आमचे मंत्री खिशात राजीनामे घेवून फिरत आहेत, आणि आता काय तर म्हणे सत्तेतून बाहेर पडू. असे म्हणणे म्हणजे एक जोकच आहे अशी खोचक टीका खा. सुळे यांनी केली.

खा. सुळे यांनी या वेळी राज्य सरकारला लक्ष्य करीत सध्या भाजपा सरकार हे केवळ भाषणे करून मार्केटिंग करीत आहे. सगळ्या घोषणा ह्या फसव्या असून,प्रत्यक्षात शेतकऱ्यांस न्याय मिळत नाही, असे सांगितले.

इंधन दरवाढी बाबत विचारले असता खा. सुळे यांनी भाजपकडे बोट दाखवत विचारले कि, पूर्वी इंधन दरवाढ झाली की एक मावशी येत होती. आता मी ती मावशी शोधत आहे,असेहि त्या म्हणाल्या.