वरुण धवन आणि सलमान आणि ‘ ती ‘ जीन्स

By | September 27, 2017

वरुण धवन नि आतापर्यंत ८ चित्रपट केले आहेत आणि सर्वच चित्रपटांनी बऱ्यापैकी व्यवसाय केला आहे. मात्र वरुण धवन अजून स्वतःला स्टार मानत नाही .

बीबीसी सोबत बोलता वरूण म्हणाला कि, “आजपर्यंत जे मिळालय ते फक्त लोकांच्या प्रेमामुळे. जे मिळवायला खूप काळ लागतो मात्र मी काही चुकीचं केल तर काही क्षणात सगळं मातीमोल होऊ शकत . फक्त आत चित्रपट करून मी सुपर स्टार च्या यादीत येऊ शकत नाही , अजून कमीत कमी १०-१५ वर्षे काम केलं तर कुठे स्टारडम वगैरे गोष्टी येतात . इतक्या लवकर मला स्टार म्हणणं थोडं चुकीचं आहे .”

सलमान खान चा १९९७ चा जुडवा नवीन रूपात ‘जुडवा २’ येतोय मात्र यात सलमान ऐवजी हिरो वरूण धवन आहे .

वरुण धवन पुढे म्हणतो कि ‘” सलमान बरोबर तुलना होणं साहजिक आहे पण माझ्यासाठी ही पूर्ण नवीन मुव्ही होती . ज्यामध्ये मला कॉमेडी करावी लागली मात्र त्यासाठी मेहनत देखील खूप घ्यावी लागली . माझा उद्देश हा केवळ लोकांचं मनोरंजन करण हा आहे ”

ह्या चित्रपटाआधी सलमान खान ची भेट वरुण धवन ने घेतली होती , त्यावर बोलताना वरुण म्हणाला, “सलमानने मला काही सल्ला दिला नाही , मात्र एवढेच सांगितले कि माझ्या टन टना टन च्या स्टेप्स खराब करू नकोस ” आणि सलमान ने वरुण धवनला ती जीन्स दिली जी सलमान च्या राजा कॅरॅक्टर साठी चित्रपटात वापरली होती .

आपल्या वडिलांच्या (डेव्हिड धवन ) बद्दल बोलताना वरुण धवन म्हणतो , “माझे भाग्य आहे कि ते माझे वडील आहेत, आणि मी वडिलांच्या समोर कधीच चुंबन दृशे देणार नाही”

वरुण धवन च्या जुडवा २ मध्ये आपल्याला जॅकलिन फर्नाडिस, तापसी पन्नू यांची जबरदस्त कॉमेडी बघायला मिळणार हे मात्र नक्की .

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??