राणेंवर आरोप : प्राप्तिकर विभागात शिपाई असलेल्या माणसाचा अंबानीच्या तोडीचा बंगला कसा ?

By | September 24, 2017

राणे हे प्राप्तिकर विभागात पहिले शिपाई होते. त्यानंतर दहावीची परीक्षा देऊन लिपिक झाले. पण आज त्यांनी मुंबईत उद्योगपती धीरूभाई अंबानीच्या खालोखाल बंगला कसा बांधला हे कसे काय शक्य झाले? त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असा सवाल करीत कोणत्याही ठेकेदाराकडून जरूर प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे.

अनेक ठेकेदार हे त्यांचेच आहेत आणि त्यांच्यामुळेच ही आजची जिल्ह्याची अवस्था आहे आणि जे कोण चुकीचे काम करणारे आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही , असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केला.

सिंधुदुर्गमधील अनेक खुनांचा तपास लागला नाही. मी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून या खुनांची माहिती देणा-या व्यक्तींना बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे लोकांनी जागृत होऊन पोलिसांना माहिती द्यावी. जे कोणी माहिती देतील त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले.

राणे हे उद्योगमंत्री असताना अनेक जमिनी परस्पर विकल्या गेल्या आहेत.उद्योग विभागातील काही प्रकरणांची चौकशी सुरू असताना राणेंना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही याचा भाजपने विचार करावा, असा सल्लाही भाजपच्या नेत्यांना दिला आहे.

समर्थ विकास पॅनलच्या नावाखाली निवडणूक लढवणा-या राणे यांनी याच नावाने पक्ष काढावा आणि निवडणूक लढवाव्यात. मग त्यांना त्यांची ताकत कळेल. पैशाच्या आणि जाणार त्या पक्षाच्या जिवावर आमदार फोडणार म्हणणे सोपे असते, पण आपल्या ताकदीवर आधी किती आमदार निवडून आणणार ते सांगा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

भाजपा हा पक्ष साधन संस्कृती मानणारा आहे. तसेच या पक्षाला गोळवलकर, हेडगेवार या महान व्यक्तींचा विचार आहे. ते कोकणचे सुपुत्रच होते. त्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे कशी काय चालू शकतात, असा सवाल करीत आम्ही आमचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??

Leave a Reply