राजन खान यांच्या कार्यालयात घुसून हलाल चित्रपटाच्या पोस्टर्सवर शाईफेक

By | September 26, 2017

मराठी साहित्यिक राजन खान यांच्या पुण्यातील अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून २ ते ३ फलकांना मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी काळे फासल्याची घटना घडली आहे.

अक्षर मानव प्रकाशन संस्थेवर हल्ला हा आगामी येणाऱ्या हलाल ह्या चित्रपटाच्या विरोधात केला गेल्याच बोललं जातंय.संस्कृतीचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यामध्ये ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

जेष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या पुण्यातील अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून चित्रपटाच्या पोस्टरला मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी काळे फासले व त्यावर शाई ओतली .मा. खान यांच्या हलाला कथेवरून तयार करण्यात आलेला हलाल सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यामुळे भावना दुखावल्याचे सांगत अवामी विकास पार्टीच्या ४ कार्यकर्त्यांंनी खान यांच्या कार्यालयात येऊन फलकांना काळे फासले. सुदैवाने खान कार्यालयात हजर नव्हते.

हलाल सिनेमाच्या पत्रकावर काळी शाई ओतून ते पत्रक कार्यालयात ठेवून कार्यकर्ते निघून गेले. या सिनेमामधून तलाकनंतर मुस्लिम स्त्रीची होणारी होरपळ दाखवण्यात आलेली आहे. तलाकच्या नावावर आजही अनेक महिलांचे शोषण करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निकाल देऊनही अजूनही मुस्लिम महिला असुरक्षित असल्याचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कडव्या धर्मांध प्रवृत्तीला आपलेच धर्मावर नियंत्रण राहावे व मुस्लिम महिला ह्या कायम शोषितच राहाव्यात हीच मानसिकता दिसून येते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणार्यांपैकी अजून तरी कोणी ह्या घटनेचा निषेध केल्याचे समजले नाही .

?? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा ??