बसफेऱ्या फेऱ्या कमी केल्यामुळे छेडछाडी चे प्रकार वाढले : राष्ट्रवादीची निदर्शने

By | September 25, 2017

नाशिक : एसटी महामंडळाने वाढत्या तोटय़ाचे कारण देत नाशिकच्या शहरी भागातील बसफेऱ्या कमी केल्या. शहरात २७४ बसफेऱ्यांपैकी केवळ १२९ फेऱ्या सुरू असून १४५ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.अचानक फेऱ्या कमी केल्यामुळे एकाचवेळी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांची गर्दी लक्षणीय वाढली आहे.

ह्या परिस्थिती मुले टारगट टोळक्यांकडून विद्याथिर्नींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महिला व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसफेऱ्या सुरू कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पंचवटी बस डेपोच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. शहर बसफेऱ्या कमी झाल्याने शहरवासीय त्रस्तावले असताना परिवहन खाते असलेली शिवसेना गप्प का आहे ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बसफेऱ्या कमी केल्याने युवती व महिलांची टवाळखोर गर्दीने भरलेल्या बसमध्ये छेड काढतात, अशी तक्रार राष्ट्रवादीने केली.

शहरातील बसफेऱ्या निम्म्यावर आल्याने त्याचा सर्वाधिक फटका शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. बससंख्या मर्यादित असल्याने बस थांब्यावर प्रचंड गर्दी होते. एकाच बसमध्ये १००-१५० विद्यार्थी, विद्यर्थिनींना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या गर्दीत टवाळखोर विद्यर्थिनीची छेड काढतात कोणी मध्ये पडले तर त्या प्रवाश्यांना मारहाणही केली जाते.

महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे बस दुरुस्त न करताच रस्त्यावर चालविली जाते. यातून अपघात होतात आणि बस चालकाला दोषी ठरवून अधिकारी नामानिराळे राहतात .

@ पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा @