पुण्यातील खडकवासला धरणातून 6 हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडले

By | September 22, 2017

Khadakwasla_Dam

धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने आज सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे बुधवारी पावसाचा जोर वाढल्यावर खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक 23 हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे पुणे शहरात पूर आला होता.

पानशेत, वरसगाव धरणातून विसर्ग सुरू असल्याने खडकवासला धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ होत आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून आता नदीत पाणी सोडण्यात येत आहे.