पुणे : हिंजवडी परिसरात झाली एक दुर्दैवी घटना

By | September 25, 2017

hinjewadi mishap

पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी परिसरात रविवारी रात्री एका लेबर कॅम्पच्या इमारतीची लोखंडी बाल्कनी कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत तर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते . मृत व्यक्तीचे नाव अजब लाल असे आहे.

औद्योगिक विकासामुळे गेल्या काही काळात पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक गृह प्रकल्पांचे काम जोमात सुरू आहे. त्यासाठी परराज्यातून आलेले बहुतांशी कामगार शेड बांधून राहतात .हिंजवडीतील एका गृह प्रकल्पाच्या फेज तीनमधील इमारतीच्या कामकाज सुरू असलेल्या जागेतही अशाचप्रकारे काही कामगार वास्तव्याला होते. येथे कामगारांना राहण्यासाठी एक लोखंडी स्लॅब आणि पत्र्यांच्या सहाय्याने तात्पुरती इमारत बनवण्यात आली आहे. काल रात्री ५० ते ६० कामगार या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत जमले होते मात्र एकाचवेळी अधिक वजनामुळे ही बाल्कनी कोसळली.

हाती आलेल्या माहितीनुसार , एल.एन. डब्लू लेबर कॅम्प हिंजवडी, फेज ३ येथे एक तात्पुरत्या पत्र्याच्या इमारतीमध्ये तब्बल सातशे ते आठशे कामगार राहतात. काल रात्री दहा वाजता छताची लोखंडी बाल्कनी कोसळून अजब लाल या कामगाराचा मृत्यू झाला. व ३५ कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, ज्या व्यक्तीने तात्पुरत्या स्वरूपाचे लोखंडी छत उभारले होते, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

@ लाईक करा .. शेअर करा @