नारायण राणेंची वाटचाल मुख्यमंत्री पदापासून ग्रामपंचायतीकडे

By | September 19, 2017

नारायण राणेंनी यांनी प्रत्येक पक्षात महत्वाची पदे भोगली असतानाही पक्षाकडे आसुरी भावनेने पाहत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेवर टीका केली आणि आणि आता काँग्रेसमधून दुसर्या पक्षात जातानाही काँग्रेस संपविण्याची भाषा राणे आणि त्यांची टोळी करत आहेत. शिवसेना व काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदासह सर्व महत्वाची मंत्रीपदे दिल्यानंतरही त्यांचे समाधान होत नाही. त्यामुळेच त्यांची मुख्यमंत्री ते ग्रामपंचायतीच्या दिशेने अधोगती सुरु झाली आहे, अशी टीका आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी मालवण शिवसेना शाखा कार्यालयात केली.

मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघून नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले होते. आता काँग्रेसवर टीका करणारे राणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. यावरूनच त्यांची अधोगती झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसमधून निलंबन होत असताना अशोक चव्हाण यांनीच राणे यांना काँग्रेसमध्ये घेतले होते, याचीही आठवण नाईक यांनी करून दिली

राणेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि समर्थकांची टोळी आता रत्नागिरीतही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे निलेश राणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचा पराभव करण्याचे दिलेले आव्हान कधीच पूर्ण होणार नसून निलेश राणेंची दाढी आयुष्यभर तशीच राहील असे वैभव नाईक म्हणाले. राणेंनी प्रथम कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असेही जाहीर नाईक यांनी राणे यांना दिले.