तब्बल ९ वर्षानंतर ‘ह्या’ धरणाचे दरवाजे उघडले गेले

By | September 22, 2017

संपूर्ण राज्यभरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व मुख्य धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण भरली असून, त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता.राज्यात बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ह्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही अशी सध्या तरी परिस्थिती आहे.

पैठणचे जायकवाडी धरणही शुक्रवारी सकाळी जवळपास भरले. त्यामुळे आता या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे . जायकवाडी धरण ९५ टक्क्यांपर्यंत भरल्याने, ९ वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले आहेत. त्यामधून १० हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

दरम्यान, धरणात अजूनही पाण्याची आवक सुरुच आहे. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढल्यास नऊ आपातकालीन दरवाजेसुद्धा उघडण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

आता नाशिक, नगर व मराठवाडय़ातही पाण्याची कमतरता नाही त्यामुळे बळीराजा सर्वाधिक सुखावला आहे.

Leave a Reply