चाकणमध्ये घडली एक दुर्दैवी घटना

By | September 26, 2017

चाकणमधील शिक्षक वसाहतीत राहणाऱ्या पती आणि पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्मेहत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. महादेव गोरोबा शिंदे आणि लक्ष्मी महादेव शिंदे अस मयत पती पत्नीचं नाव आहे.

मयत महादेव गोरोबा शिंदे यांना दोन पत्नी आहेत. त्यातील पहिली पत्नी ही उस्मानाबादमधील चारोळा या मूळ गावी राहते. तर दुसरी पत्नी महादेव यांच्या सोबत चाकणमध्ये राहत होती. पहिल्या पत्नीचा मुलगा विकास हा देखील त्यांच्यासोबत राहात होता. सोमवारी दुपारी विकास जेवणासाठी कामावरून घरी आला. त्याने दरवाजा बराचवेळ ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तो पुन्हा कामावर निघून गेला.

रात्री पुन्हा घरी परतल्यानंतरही दार बंदच होते. त्याने दार ठोठावल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या अवस्थेत त्यानं शेजारी राहणाऱ्या नातेवाईंकाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडल्यानंतर स्वयंपाक घरात पती आणि पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.