काय राव .. घरात कोंडलेला बिबट्या पण वनखात्याला धरता येईना

By | September 25, 2017

रात्री १० वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चोरमारवाडी-येणपे येथे भुकेपोटी भरकटलेला बिबटय़ा बछडय़ासह घरात घुसला. याबाबतची खबर लगेचच ग्रामस्थांनी पोलीस व वनखात्याला दिली. मात्र, १३ तास कोंडलेल्या बिबटय़ाने अखेर डोळ्यादेखत वनखात्याला गुंगारा देत डोंगराच्या दिशेने धूम ठोकली मात्र बछडय़ाचा सुगावा न लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याच्या ह्या अपयशी कामगिरी (?) ची नागरिकांच्या मधे चर्चा आहे.

कराड तालुक्यातील चोरमारवाडी येथे बाबासो, हणमंत व महादेव चोरमारे यांचे एकत्र कुटुंब रहते . काल शनिवारी रात्री घरातील सर्वजण जेवन करून झोपण्याच्या तयारीत असताना बाबासाहेब यांच्या सूनबाई वनिता संदीप चोरमारे या अंगणात भांडी घासत बसल्या होत्या. यावेळी त्यांना स्पर्श करून बिबटय़ा व त्याचे बछडे घरात घुसले.आधी हे पाळीव श्वान असावेत असे अंदाज वनिता यांना वाटले, मात्र, त्यांनी बारकाईने पाहिले असता बिबटय़ाने बछडय़ासह घरात प्रवेश केल्याचे त्यांच्या ध्यानात आले. यावर वनिता यांनी आरडाओरडा करून कुटुंबातील व वस्ती वरील लोकाना बोलावले.

शेवटी प्रसंगावधान ओळखून बाबासाहेबांनी कुटुंबातील सर्वाना घराबाहेर काढून दरवाजे बंद करून बिबटय़ा व बछडय़ाला कोंडले आणि याबाबतची खबर पोलीस व वनखात्याला देण्यात आली. वनखात्याने आज रविवारी पहाटेपासून अनेक क्लृप्त्या लढवत चोरमारे कुटुंबीयांच्या दहा खोल्यांची झाडाझडती घेतली. परंतु, बिबटय़ा घरात नसल्याचा निष्कर्ष काढला.

मात्र बिबटय़ा व बछडा घरातच असल्याचा दावा करीत चोरमारे कुटुंब आपल्या आपल्या बोलण्यावर ठाम होते मग घरावरील कौले उचकटून पाहिले असता माळय़ावर कोपऱ्यात बिबटय़ा बसल्याचे निदर्शनास आले. मग संपूर्ण घरावर जाळी अच्छादून बिबटय़ाला पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही जाळी कुचकामी ठरली. बिबटय़ाने डोळ्यादेखत सर्वाना गुंगारा देऊन डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. पण, बछडा कुठे आहे हा वनखात्याला प्रश्न असून चोरमारे कुटुंबीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर, बिबटय़ाला पकडण्याची कामगिरी अपयशी ठरल्याने वनखात्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??