कर्जमाफी म्हणजे ‘ लबाडाच्या घरचे आवतण ’ : कोण म्हणालय असं ?

By | September 25, 2017

सरकारची कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाच्या घरचे आवतण’ आहे. असले आवतण जेवल्याशिवाय काही खरे नसते. त्यामुळे कर्जमाफीचे जेवण कधी मिळेल याची शाश्वती नाही . संपूर्ण कर्जमाफी देण्याचे जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी ‘ संपूर्ण ‘ शब्द काढून टाकला व सहा वेगवेगळे आदेश काढून अटी टाकल्या. त्यामुळे कर्जमाफी अधिक किचकट व अटींची झाली आहे ते शरद पवार यांनी अहमदनगर येथे सांगितले

एकीकडे सत्तेची गोड फळे चाखायची आणि दुसरीकडे त्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करायचे, अशा शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावरहि कडकडून टीका केली . ते म्हणाले, महागाईच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन करणे अभिनंदनीय आहे. पण सत्तेत राहून आंदोलन करणे बरे नाही, एक तर त्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवा नाहीतर रस्त्यावर उतरावे.

पुढे ते म्हणाले कि , बुलेट ट्रेन ही काही सर्वसामान्यांची गरज नाही. ती श्रीमंतांसाठी सुरू होत आहे. त्याचा फायदा गुजरातला होणार आहे. मात्र त्याचा काही आर्थिक बोजा विनाकारण महाराष्ट्रावर पडणार आहे. भाजपच्या तीन वर्षात महागाई वाढली, रोजगार कमी झाला, शेती उत्पन्न घटले, औद्योगिक उत्पन्न घटले. याकडे दुर्लक्ष करून बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पातील आर्थिक गुंतवणूक चिंताजनक आहे .

भाजपाच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा आतून पाठिंबा आहे, असे विधान केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, रामदास आठवले हे स्वभावाने विनोदी गृहस्थ आहेत, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही पवार म्हणाले.

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??