एवढी लाटणी कशाला, भाजपला ठोकायला : शिवसेना

By | September 26, 2017

सत्तेतून राहावे कि बाहेर पडावे , या विचारचक्रातून शिवसेना अजून बाहेर आलेली दिसत नाही .

गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मंगळवारी शिवसेनेच्या वतीने पुणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

‘महागाई वाढली बुलेट ट्रेनच्या वेगाने’, ‘कधी येणार अच्छे दिन?’, ‘भाजप एक धोका है, देश बचालो मौका है’, ‘पेट्रोल भाज्यांनी रडवले, अच्छे दिन आणणा-यांनी फसवले’, ‘एवढी लाटणी कशाला, भाजपला ठोकायला’, अशी भाजपविरोधात शेलकी घोषणाबाजीही करण्यात आली. आपण पण त्याच सरकारमध्ये सहभागी आहोत हे बहुदा शिवसैनिक विसरून गेले असावेत.

महिलांनी महागाईवरील पथनाटय़ देखील सादर केले. तसेच बैलगाडीवर अन्नधान्य, सिलिंडर आणि तेलाचे डबे घेऊन कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. सत्ता सोडायचीच नसेल तर फार्स कशाला ? . सत्तेत राहून सरकारविरोधी घोषणाबाजीचा फार्स आणखी किती दिवस करणार, असा सवाल आता विचारला जात आहे.

हिम्मतच नाही तर असे करून हसू तरी का करून घेता असेही लोक आता बोलू लागले आहेत.

@@पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा ..शेअर करा @@