एकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घेण्यासाठी पाकिस्तान मधून फोन आल्याचा ‘ यांचा ‘ दावा

By | September 23, 2017

dawood ibrahim

राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधातील मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झालेले खटले मागे घ्यावेत, यासाठी पाकिस्तानातून धमकी आल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

पाकिस्तानातून हा फोन आला असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आपल्याला हा फोन आला होता, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.ट्र्यु कॉलर वर हा नंबर दाऊद २ या नावाने दाखवत आहे असे दमानिया यांचे म्हणणे आहे.

दमानिया यांनी या धमकीच्या दूरध्वनी क्रमांकाचे स्क्रीनशॉट्स ट्विटरवर शेअर केले आहे व या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, एका कार्यक्रमात दमानियांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दमानियांच्या तक्रारीनुसार, खडसे यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. जळगावमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत आपल्याला माहिती दिली होती, असे दमानियांनी नमूद केले होते. या प्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दमानियांच्या समर्थकांनी केली होती.

आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी पाकिस्तानमधून दाऊद हा फोन आला हे दमानिया यांचे म्हणणे कितपत खरे आहे हे पोलीस तपासाअंती उघड होईलच मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडवून द्यायला ही एक बातमी पुरेशी आहे.