आणि ‘ म्हणून ‘ रोहिंग्या मुसलमानांनी केली ४५ हिंदूंची हत्या, म्यानमार सरकारने दिले पुरावे

By | September 25, 2017

rohigya muslims killed 45 hindus

भारतात साधारण ४०००० च्या दरम्यान रोहिंग्या मुसलमान राजस्थान व जम्मू येथे राहत आहेत . म्यानमार सैन्याच्या अत्याचाराला कंटाळून ते देश सोडून आले हे जरी खरे असले तर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या रोहिंग्या यांचा रखाईन प्रांतामध्ये रोहिंग्या मुसलमानांनी ४५ हिंदूंची हत्या करून त्यांना पुरल्याचे पुरावे आढळले आहेत .

हे पुरावे म्यानमार सरकार कडून आज भारत सरकारला देण्यात आहेत . मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागात दुसऱ्या धर्माचे लोक जिवंत राहिलेच नाही पाहिजे अशी रोहिंग्यां मुसलमानांची जर भूमिका असेल तर भारतात तरी ह्या रोहिंग्यांना का थारा द्यावा ? हा मोठा प्रश्न आहे ..मात्र मतांसाठी लाचारी करणारे मानवतेच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायला तयार आहेत . सगळ्या मुस्लिम संघटना जणू रोहिंग्या हे भारताचे प्रथम नागरिक आहेत कि काय अशा पोट तिडकीने रोहिंग्यांची बाजू मांडत आहेत .. विशेष म्हणजे मुस्लिम बहुसंख्य बांगलादेश मध्ये सुद्धा त्यांचे मोठ्या प्रमाणात कोणी समर्थन करत नाही, तिथे भारतापेक्षा जास्त रोहिंग्या स्थलांतरित झालेत .

रखाईन प्रांतात ४५ हिंदूंची हत्या करून त्यांना खड्ड्या मध्ये पुरले गेले . त्यात २० महिला ८ पुरुष व इतर ६ ते १० वर्षाच्या लहान मुलांचा देखील समावेश आहे . ज्यांनी इस्लाम कबूल केला त्यांना मात्र मारण्यात आले नाही . यावरूनच रोहिंग्या काय आणि कश्मीर मध्ये हिंदू पंडितांची हत्या करणारे काय यांची मानसिकता स्पष्ट होते .

या खेरीच , रोहिंग्या मुस्लिमांचे पाकिस्तानी अतिरेकी संघटनेशी देखील संबंध आढळून आले आहेत . अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम राजकीय पक्ष व विद्वान ( ? ) रोहिंग्यांची बाजू मांडत आहेत हे देशाचे दुर्भाग्य आहे . भारतातील रोहिंग्या मुस्लिमांमध्ये जी लहान मुले व महिला आहेत, ह्या अतिरेकी आहेत का ? असा अजब दावा रोहिंग्यांचा कैवार घेणाऱ्यांकडून केला जातोय , मात्र पाकिस्तान मध्ये लाल मशिदीवर जेव्हा कारवाई झाली तेव्हा कित्येक महिला धर्मासाठी जीव द्यायला तयार झाल्या होत्या आणि राहिला विषय लहान मुलांचा तर पाकिस्तान मध्ये कित्येक सुसाईड बॉम्बर ही अल्पवयीन मुले सुद्धा राहिली आहेत .

भारताने ही डोकेदुखी का घ्यावी हा एक मोठा प्रश्न आहे . सुसाईड बॉम्बर आणि रोहिंग्यांचे अतिरेकी संघटनेशी संबंध येऊ नये ,याची काळजी देखील सरकारने घ्यायला हवी,अशी (निर्लज्ज ? ) प्रतिक्रिया द्यायला देखील रोहिंग्या समर्थक विसरत नाहीत. धर्माच्या नावावरून हत्या करणारे भारतात का हवेत ? आणि उद्या जर त्यांच्याकडून भारतात अशी काही आगळीक झाली तर तमाम मुस्लिम समाजाला ( जे मूळचे कट्टर भारतीय आहेत ) त्याचे परिणाम भोगावे लागतील. हा विचार करण्याचे सुज्ञ पण ह्या रोहिंग्या समर्थकांकडे नाही.

तरीसुद्धा त्याकडे डोळेझाक करून आपली राजकीय पोळी व वोट बँक टिकावी म्हणून तमाम मुस्लिम संघटनांचा आटापिटा चालू आहे. खर तर रोहिंग्या नकोत ही भूमिका याआधी मुस्लिम समाजाची पाहिजे होती, पण ही संधी सुद्धा मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाने गमावली आहे.

@@ पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा @@