आणि ‘ म्हणून ‘ पाठवल्या २७ तरुणांना नोटीसा ..सरकारची दडपशाही सुरूच

By | September 23, 2017

cyber cell notice to 27 youth

फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणा-या एका तरूणाचे फेसबुक फ्रेंड असल्याच्या कारणावरून २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टीका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोटीसा मिळालेल्या तरूणांनी केला आहे. पोलिसांनी पाठविलेल्या या नोटीसा म्हणजे घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली असल्याचे म्हटले जातेय.

पुणे, मुंबई, बीड अशा राज्याच्या विविध भागातील तरूणांना या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. मानस पगार, आशिष मेटे, ब्रह्मदेव चट्टे, श्रेणीक नरदे, योगेश वागज, सचिन कुंभार, महेंद्र रावले या आणि इतर काही जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.खासकरून शेतकऱ्याच्या हक्काची बाजू मांडणाऱ्या तरुणांना सरकारने धारेवर धरले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व विशेषत: सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना धारेवर धरणा-या या निवडक तरुणांना ह्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवी सरदेसाई यांनी सांगितले, ‘‘केवळ एका गुन्हयाच्या चौकशीमध्ये जबाब नोंदविण्यासाठी त्यांना नोटीसा पाठविल्या आहेत. नोटीसांमध्ये त्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. फेसबुकवर सरकार विरोधात लिखाण करण्याचा या नोटीसांशी काहीही संबंध नाही.’’
मात्र सरकारवर दडपशाही केल्याचा आरोप केला जातोय.

सरकारच्या धोरणाविरूध्द भुमिका घेणा-या ज्या तरूणांचे फ्रेंड फॉलोअर जास्त असून त्यांच्या लिखाणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे,त्यानेच सरकार अशा व्यक्तींची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे .एक प्रकारे ही हिटलरशाहीच अवतरली कि काय अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटते आहे.

मात्र , याप्रकरणी काही जणांना साक्षीदार म्हणूनहि चौकशी साठी बोलवण्यात आले आहे.काहीजण या बाबत खोटी माहिती सोशल मीडिया वर पसरवत आहेत.कृपया अशा माहिती वर विश्वास ठेवू नका. या बाबत मुबई पोलिस दला कडून अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांनी केले आहे.

काँग्रेस च्या काळात ज्या सोशल मीडिया चा दणकून वापर (गैरवापर ? ) करून भाजप सत्तेवर आली, त्याच भाजपाला आज सोशल मीडियाची भीती वाटायला लागलीये हेच यावरून दिसून येते.

??पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ??