‘ ह्या कारणामुळे ‘ माझ्यावर आली बी ग्रेड चित्रपटात काम करण्याची वेळ

By | September 24, 2017

zarine khan aksar 2

मायानगरीची झगमगीत दुनिया अनेक तरुण-तरुणींना आपल्याकडे आकर्षित करते. अनेकदा अभिनय सोडून सौंदर्य, शरीरयष्टी या बाह्यगोष्टींना या दुनियेत गरजेपेक्षा अधिक दिले जाते. जाड असणे किंवा सावळेपणा अनेकांच्या बॉलीवूड करियरसाठी अडथळा ठरतो. अभिनेत्री झरीन खानलाही सुरूवातीच्या काळात अशाच अडचणींचा सामना करावा लागल्याची कबुली तिने दिली .

सलमान खानच्या ‘वीर’ सारख्या बिग बजेट चित्रपटाद्वारे झरीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, बॉलीवूड मध्ये अभिनेत्रींच्या निवडीसाठी शारीरिक मापदंड खूपच असल्यामुळे तिला काही मोठ्या चित्रपटांना मुकावे लागले. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत झरीन तिच्या करिअरविषयी म्हणाली की, मला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. सलमानसोबत मला काम करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होत.

मात्र पहिल्या चित्रपटानंतर माझा खरा संघर्ष सुरु झाला. मी इतर अभिनेत्रींप्रमाणे दिसायला सुंदर असले तरी माझे वजन जास्त असल्याने बरेच टोमणे खावे लागले. इतर अभिनेत्रींनी वजन वाढवले तर त्यांची प्रशंसा करण्यात यायची, मात्र अगदी त्याच्या उलट प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत होते.

माझ्यावर तेव्हा टीकेचा भडीमार होत होता. मी कशी दिसते? कसे कपडे घालते? यामुळे मी निराशेच्या गर्तेत होते व घरातून बाहेर पडणेही कठीण झाले होते. पण, माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे मला स्वतःला सांभाळणे गरजेचे होते, असेही झरीनने म्हटले

स्थुलपणा व जास्त वजनामुळे मुळे झरीनला ‘ए’ ग्रेड चित्रपटांना मुकावे लागले. ‘हेट स्टोरी ३’मुळे मात्र आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल आल्याचेही तिने आवर्जून सांगितले. झरीन च्या ‘अक्सर २’मध्येही झरीनचा हॉट अंदाज दिसणार आहे. याबद्दल ती म्हणाली की, चुंबनदृश्य आता चित्रपटांमध्ये सामान्य बाब झाली आहे. पण त्यातही भेदभाव आहेच , मोठ्या बॅनरच्या चित्रपटात एखाद्या मोठ्या अभिनेत्याने चुंबनदृश्य दिले तर त्याला ‘हॉट’ म्हटले जाते. पण, आमच्यासारख्या छोट्या कलाकारांनी असं केलं तर त्याला ‘इरॉटिक’ म्हणून संबोधले जाते .