दंगल गर्ल झायरा वसिमची विमान प्रवासादरम्यान छेडछाड : केला व्हिडिओ अपलोड

By | December 10, 2017

zaira wasim molested while travelling from delhi to mumbai by plane

झायरा वसिम दिल्लीहून मुंबईला येत असताना तिची छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. झायरा वसिम सेलेब्रिटी असल्याने ती प्रवास करत असलेल्या विस्तारा एयरलाइन्स आणि पोलीस दोघांनाही ह्या प्रकारानंतर अचानक जाग आली आहे .अर्थात प्रकारची करावी इतकी निंदा कमीच आहे मात्र अशाच प्रकारे रोज कित्येक मुली बसमधून, ट्रेनमधून प्रवास करतात, त्यांना देखील अशाच स्वरूपाचे अनुभव येत असतात मात्र तक्रार घेऊन गेल्यावर होणारा नको नको तो प्रश्नाचा भडीमार यामुळे बहितेक मुली तरुणी पोलिसांकडे जात नाहीत. मात्र झायरा वसिम ने ह्या कटू अनुभवला वाचा फोडली ह्याबद्दल तिचे कौतुक करायला हवे.

दंगल तसेच सिक्रेट सुपरस्टार मध्ये झायरा वसिम ने काम केले आहे . ती दिल्लीहुन मुंबईला येत होती त्यावेळी हा दुर्दैवी प्रकार तिच्यासोबत झाला. झायरा वसिमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करुन या घटनेचं वास्तव तिने सांगितलं. विमानात मागे बसलेल्या प्रवाशाने छेड काढल्याचं झायराने या व्हिडीओत सांगितलंय. ही संपूर्ण घटना वर्णन करत असतानाच झायराला रडू कोसळलं. दिल्लीहून मुंबईला येताना झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या मध्यमवयीन पुरुषानं अश्लील वर्तन करायचा प्रयत्न केला. तिच्या मानेला आणि पाठीला स्पर्श करायचा त्यानं प्रयत्न केला. झायरानं विमानातच व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला. पण तिथे प्रकाश कमी होता त्यामुळे तिला हा व्हिडिओ नीट शूट करता आला नाही. मात्र विमानातून उतरल्यावर तिनं आणखी एक व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओत तिला अश्रू अनावर झाले. कुणी असं कसं वागू शकतं.आम्हा मुलींनाच आमचं संरक्षण करावं लागणार आहे. इतर कुणीही पुढे येणार नाहीये, असं ती रडत रडत ह्या व्हिडिओ मध्ये सांगते.

झायरा वसिमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर झायरा वसिमसोबत छेडछाड करणाऱ्या त्या आरोपीची माहिती पोलिसांनी मिळवली आहे. विस्तारा एयरलाइन्सने झायराची छेड काढणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना दिली आहे. हा व्यक्ती भारतीयच असून पोलीस ह्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

अधिक माहितीसाठी , मुंबई पोलीस या घटनेच्या माहितीसाठी झायराच्या हॉटेलमध्ये पोहोचले होते. झायरा या घटनेनंतर खूप अस्वस्थ झाली होती. ह्या मानसिक धक्क्यातून सावरण्यास तिला बराच वेळ लागला त्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका महिला अधिकाऱ्याने तिचा जबाब नोंदवला. झायराच्या सोबत असणाऱ्या सर्व प्रवाशांची लिस्ट बनवण्यात आली आहे. तिच्यासोबतच्या प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची देखील चौकशी होणार आहे

दंगल चित्रपटातली अभिनेत्री झायरा वसीमशी विमानात विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत तिची तक्रार घेण्यासाठी मुंबई पोलीस झायराच्या हॉटेलवर गेले होते. मुंबईत हयात हॉटेलमध्ये जाऊन पोलिसांनी तिची तक्रार घेतली. पोलीस आता पुढचा तपास करत आहेत

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

सनी लिओनीने तिच्यासोबतच्या प्रॅन्क चा ‘असा ‘ घेतला बदला : पहा व्हिडिओ

आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत डेट करतोय हा मराठी अभिनेता

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?