‘ ह्या ‘ कारणावरून त्याने जिवंत विद्युत तारांना स्पर्श करून आयुष्य संपवले : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

By | December 28, 2017

youth suicides by touching live electricity wire in chandrapur maharashtra

जेलमधील असह्य यातना आणि पोलिसांकडून दिला जाणारा त्रास आता काही लपून राहिला नाही. अनिकेत कोथळे प्रकरण असो वा मंजुळा शेटे प्रकरण. जेलमधील नरकयातना असतातच, मात्र कायद्याच्या बाहेर जाऊन देखील पोलिसांकडून कैद्यांवर अनेक प्रकारचे अत्याचार केले जातात हे ह्या दोन प्रकरणांमधून जनतेच्या समोर आले आहे . काही जण पोलिसांच्या अत्याचाराचे बळी ठरतात तर काही जण ह्या नरक यातना सोसून आल्यावर देखील काही चांगले देखील करू शकत नाही इतके मानसिकदृष्ट्या खचलेले असतात . तर काही जण मरण हवे पण येत नाही म्हणून, झटपट मृत्यू यावा म्हणून संधीच्या शोधात असतात . योग्य वेळ मिळताच ते आत्महत्या करून मोकळे होतात व आपले आयुष्य संपवून टाकतात. असाच एक दुर्दैवी प्रकार भद्रावती (जि. चंद्रपूर ) इथे घडला आहे. मृतकाचे नाव देवकुमार ऊर्फ गोली बेडू कोराम असून अवघ्या २४ वर्षाच्या ह्या युवकाने विजेच्या जिवंत तारांना स्पर्श करून आपले आयुष्य संपवले.

अवैध दारूविक्रीच्या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयामध्ये हजार करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र त्याने दिवाणी व फौजदारी न्यायालयातून पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. पळ काढल्यानंतर तो थेट उच्च वीज दाबाच्या टॉवरवर चढला. अशातच त्याने जिवंत वीज तारांना स्पर्श करून आत्महत्या केली. भद्रावती येथे बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. देवकुमारविरुद्ध देखील दारूविक्रीचा गुन्हा नोंदविला होता. मात्र तो फरार होता पुढे मंगळवार दि. २६ डिसेंबरला त्याला भद्रावती पोलिसांनी शिताफीने अटक केली.बुधवारी त्याला न्यायालयात आणले होते त्यावेळी इतर आरोपींशी बोलताना तो आपली जमानत घ्यायला कोणीच नाही त्यामुळे जेलमध्ये जावे लागेल याची खंत व्यक्त करत होता. थोड्याच वेळात त्याने पोलिसांना चकमा दिला व सरळ पळत सुटला. पोलीस त्याचा पाठलाग करत होते. चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या बाजुलाच असलेल्या कटारिया ले-आऊटमध्ये तो शिरला. तेथे लागूनच असलेल्या उच्च वीज दाबाच्या वाहिनीेच्या टॉवरवर चढून बसला . त्याला खाली उतरण्यासाठी अनेकांनी विनवणी केली असता मला जेल होईल. मला जेलमध्ये जायचे नाही, असा तो ओरडून सांगत होता. अशातच त्याने जिवंत विद्युत तारांना स्पर्श केला. त्यानंतर तो खाली कोसळला, जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

जेलमधील नरकयातना आपल्या नशिबी येऊ नयेत म्हणून त्याने हे दुर्दैवी पाऊल उचलल्याचे समजते.

देवाचे शनी शिंगणापूर गॅंगवॉरने हादरले : भर बाजारात एकाचा अमानुष खून

बापरे..महिला तहसीलदारांना वाळू तस्करांकडून अक्षरश: डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न

गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?