होय … पाकिस्तानने आमचा भरपूर फायदा घेतला

By | October 14, 2017

yes pakistan took many benefits from us donald trump

पाकिस्तानने आमच्या राजकीय मजबुरीचा भरपूर फायदा घेतला असल्याची कबुली डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधताना हे वक्त्यत्व केले आहे. पाकिस्तानने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर फायदा घेतला असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे.मात्र आता यापुढे पाकिस्तानबरोबर वास्तविक संबंधांना सुरूवात झाल्याचेही ते म्हणाले.

पाकिस्तानच्या हक्कानी नेटवर्क च्या ताब्यातून एका अमेरिकन कुटुंबाचे अपहरण करण्यात आले होते. पाकिस्तानने शुक्रवारी हक्कानी दहशतवादी नेटवर्कच्या ताब्यातून अमेरिकन कुटुंबाला मुक्त केल्यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे.पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गुरूवारी एक मोहीम राबवून अमेरिकन नागरिक कॅटलान कोलमॅन आणि तिचा कॅनडियन पती जोशुआ बोएले याच्यासह त्यांच्या तीन मुलांचे वर्ष २०१२ मध्ये अफगाणिस्तानच्या दौऱ्यादरम्यान या कुटुंबीयाचे अपहरण करण्यात आले हेाते. विशेष म्हणजे या तिन्ही मुलांचा जन्म दहशतवाद्यांच्या ताब्यात असतानाच झाला आहे. अखेर या कुटुंबीयांना मुक्त केल्यानंतर ट्रम्प यांनी पुढे पाकिस्तानच्या सोबत सकारात्मक बदल होतील असे म्हटले होते.

ट्रम्प पुढे म्हणाले की, पाकिस्तानने इतक्या वर्षे अमेरिकेकडून फक्त फायदा उठवला आहे. पण आता पाकबरोबर आमच्या वास्तविक संबंधास सुरूवात झाली आहे. आता पाकिस्तान आणि दुसऱ्या देशांना एक राष्ट्र म्हणून पुन्हा एकदा आमचा सम्मान करायला हवा. त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचा मान राखण्यास सुरूवात केली आहे. याबद्दल पाकिस्तानच्या नेत्यांचा मी आभारी आहे, असेही त्यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर पाकिस्तान बद्दल त्यांची भूमिका कायमच सडेतोड राहिली आहे .पाकिस्तान हाच जगातील सर्व दहशतवादाचे केंद्र असल्याची ट्रम्प यांची आधीपासूनच भूमिका राहिली आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?