राज्यपालांचा ‘ असा ‘ राजधर्म, येडियुरप्पा यांचा उद्या शपथविधी मात्र ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

By | May 16, 2018

bjp angry over congress in karnataka

कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळं सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस-जेडीएसने सत्ता स्थापनेसाठी दावा केल्यानंतर आता भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी आमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सरकार स्थापन करण्याची स्वप्नं धुळीला मिळण्याची शक्यता आहे.मात्र राज्यपालांच्या ह्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण देण्यात आले असून उद्या सकाळी 9.30 वाजता येडियुरप्पांचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला 21 मेपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती आहे. काल कर्नाटकाचा निकाल हाती आला. यामध्ये बहुमताचा 11३ आकडा कोणालाही गाठता आला नाही. भाजप हा 104 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत. मात्र काँग्रेसने जेडीसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली होती. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून तब्बल 116 आमदारांचे बळ असून देखील राज्यपाल पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप आहे.

काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची आज भेट घेतली. यावेळी जेडीएस आणि काँग्रेसनं बहुमत असल्याचा दावा करत 117 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांना सोपवली. जेडीएसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते हजर होते. यावेळी मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाबाबत कुठलंही आश्वासन दिल नाही मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला हे निमंत्रण दिले त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी आता भाजपवर येऊन पडली आहे .

  • कोण आहेत कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला?

वजुभाई वाला हे गुजरातमधील ज्येष्ठ भाजपा नेते आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले वजुभाई हे स्वाभाविकच मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. २००१ मध्ये त्यांनी आपला मतदारसंघ मोदींसाठी सोडला होता. त्यानंतर तब्बल नऊ वर्षं ते गुजरातमधील मोदी सरकारचे अर्थमंत्री होते. त्याआधीही त्यांनी हे खातं समर्थपणे सांभाळलं होतं. तब्बल १८ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, सप्टेंबर २०१४ मध्ये वजुभाईंची नियुक्ती कर्नाटकचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. मात्र आता त्यांच्यावर देखील पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप कॉंग्रेसकडून होतो आहे. हाच न्याय गोवा व मणिपूर च्या राज्यपालांनी का लावला नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे.

तसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकच्या निकालावर राज ठाकरे काय म्हणाले ? : भाजपच घोड अडलय ‘ इतक्या ‘ सीटवर

भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता स्थापनेकडे वाटचाल : काय आहे सध्याची ताजी परिस्थिती ?

मोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय ? : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे

कर्नाटकमध्ये भाजपला मिळतील ‘ इतक्या ‘ जागा : अमित शाह यांचा विश्वास

काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले ?

लोकनिती-सीएसडीएस एबीपी न्यूजच्या एक्सिट पोलनुसार ‘ हा ‘ पक्ष सत्तेचा दावेदार ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

भाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना ?

बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल ?

काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली

आणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी ?

स्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा