कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी एल्गार मोर्चा निघणारच : प्रकाश आंबेडकर

By | March 26, 2018

prakash ambedkar says hafiz saeed will be born in hindu house

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघानं आज मुंबईत एल्गार मोर्चाचं आयोजन केले आहे. जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, भारिपच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे, आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आझाद मैदानावर आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आझाद मैदानात दाखल झाले आहेत.

”मुंबईतील एल्गार मोर्चाला परवानगी नाकारून सरकारने लोकशाहीचा गळा घोटला असून, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारण्याचे काम सरकारकडून होत आहे. पोलिसांच्या आडून सरकारच ‘गोळी’ चालवत आहे. एल्गार मोर्चासाठी महाराष्ट्रातून नागरिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते आता परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सोमवारचा एल्गार मोर्चा निघणारच”, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे.पोलिसांनी ऐन वेळी मोर्चाला परवानगी नाकारली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी पोलीस आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

परवानगी नाकारायचीच होती, तर ती आधीच नाकारायची होती. आता मोर्चासाठी राज्यातून लोक निघाले आहेत. त्यांना परत पाठविता येणार नाही. जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात करायचे आमचे नियोजन होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारून ते विस्कटवले. आता आम्ही थेट सीएसएमटीला जमणार आणि तिथेच काय तो निर्णय घेणार. आता नियंत्रण करणे आमच्या हातात नाही. सोमवारी जे काही होईल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. सरकारने अजूनही आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहनही देखील त्यांनी सरकारला केले आहे .

मिलिंद एकबोटेंच्या अटकेनंतर संभाजी भिडे यांनाही अटक होईल, अशी अपेक्षा होती, परंतु सरकारकडून कोणतीच हालचाल नाही. ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर बंदी घातली जात आहे, तर मारणारे मोकाट फिरत आहेत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली. ‘मला कोणतेही मंत्रिपद कधीच नको होते. त्यामुळे माझ्याबाबत कुणाला राजकीय भीती बाळगण्याचे कारण नाही. या सरकारने आणि आधीच्या सरकारनेही मला मंत्रिपदाची आॅफर दिली होती,’ असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.

संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणाऱ्या एल्गार मोर्चाला संभाजी ब्रिगेडने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात ब्रिगेड आपल्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी उतरणार असल्याचे, संभाजी ब्रिगेड कडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

नावे जाहीर न करता कोरेगाव हिंसा प्रकरणी १२ जण धरले : कारवाईला सुरुवात

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

आरोप कशाच्या आधारे ? प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा