साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका : मराठीच्या नावाचा पोरखेळ

By | October 10, 2017

स्थानिक लोक नीट काम करत नाहीत .. वेळी अवेळी न सांगता सुट्ट्या घेणे .. कामाचे तास कमी करून घेणे .पुढे युनियन करून बंद किंवा संप घडवून आणणे .प्रत्येक उद्योजकाची हीच रडारड .. अर्थात काही व्यवसाय असे असतात कि जिथे अशा कारणामुळे मोठा लॉस होतो किंवा माल फेकूनच द्यावा लागतो . उदा. फूड इंडस्ट्रीज किंवा पोल्ट्री सारखे लाईव्ह स्टॉक व्यवसाय .. परप्रांतीय १२-१२ तास काम करतात .. न सांगता सुट्ट्या घेत नाहीत ..फॅक्टरी मध्ये चोरी केलीच तर तो चोरीचा माल विकण्याचे मार्ग त्यांना ठाऊक नसतात .. त्यामुळे चोरी होण्याचे चान्सेस सुद्धा कमी असतात .. कधी चोरी पकडली तर माफी मागून मोकळे होतात, पगारातून पैसे कापून देण्याची तयारी दाखवतात पण गावाचा लोकल नेता आणून आधीच वाढत्या स्पर्धेमुळे चिंतीत असलेल्या उद्योजकाला दमदाटी करत नाही ..

आज महाराष्ट्रातील कोणत्या पण उद्योजकाला विचारा .. लोकल माणूस का घेत नाही कामाला ? एकाच उत्तर असते ..आपले लोक काम करत नाहीत .. अवजड कामाला आपले लोक हाथ लावत नाहीत .. ही वस्तुस्थिती आहे … राहिला विषय गुन्हेगारी आणि महाराष्ट्रात आल्यावर पोलीस स्टेशन ला हजेरी देऊन नियमाचे पालन करण्याचा .. तर ते १०० टक्के झाले पाहिजेच पण पोलीस प्रशासनाची सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही .. आता पर्यंत फक्त मराठी मराठी आणि मराठी माणूस माणूस करणार्यानी पोलीस प्रशासनाला किती वेळा ह्या विषयावर जाब विचारला आहे … मुळात पोलिसांना जाब विचारण्याची हिम्मतच नाहीये .. कायम सॉफ्ट टार्गेट शोधायचे .. त्यांना मारायचे ..कारण त्यांची बाजू जो घेईल तो देशद्रोही, घरचा भेदी असा शब्दसंग्रह आहेच.

उद्या असेच मराठी माणसाबाबत बाहेर होऊ लागले तर ?. केवळ मराठी आहेत म्हणून त्यांना मारहाण होऊ लागली तर .. जास्त लांबचे जाऊद्या .. बेळगाव मधेच थोडे झाले होते तर लगेच अंग काढून घेतले होते , (कोरडी सहानभूती नकोय कुणाला ) म्हणे किती दिवस बेळगावच्या प्रश्नासाठी लढायचं .. तिथल्या लोकांनीही तिथे समरस झालं पाहिजे .. हे बेगडी मराठी प्रेम नको आता .. मुंबई मराठी आहे म्हणून तीच भांडवल करताय पण जी पण मेट्रो शहर आहेत तिथं सर्वांचाच हा बाहेरच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे . ( म्हणजे दिल्ली, कोलकत्ता आणि आपलं पुणे पण )

मुळातच जागतिकीकरणामुळे मोठ्या शहरात अमर्याद रोजगाराच्या संधी तयार झाल्या . त्यामुळे बाहेरचे लोक खूप आले. स्थानिक ज्यांच्या जागा, दुकाने,फ्लॅट आहेत ते त्यांनी भाड्याने किंवा चालवायला दिली . आता असा कमी कष्टात पैसे मिळायला लागला तर यु.पी, बिहारींच्यासारखी हमाली कोण करणार ? म्हणून स्थानिक लोक अशी कामे करतच नाही किंवा काही गरिबांनी केली तर वर सांगितल्या प्रमाने करतात. आता कोणताही व्यावसायिक उद्योग चालवणे हे बघेन, कि रोज नवीन कामगार कुठून आणावे हे शोधत बसेन . म्हणून मराठी मालक सुद्धा परप्रांतीयांना रोजगार देतो . पण व्यवसाय कशाशी खातात आणि कसा करतात (अर्थात फक्त नावाचा व्यवसाय नको ) याची माहिती नसली कि फक्त मराठी, स्थानिक असे बोलायला सोपे असते..

आधी साऊथ इंडियन ,पंजाबी, मग युपी ,बिहारी यांना क्रमाक्रमाने विरोधच विरोध .. आज मराठी सिनेसृष्टीतले काही लोक कॅमेरे ,मेकअपमन ज्यावेळी भोजपुरी सिनेमा च्या शूटिंग ला जातात तिथे मराठी आहे म्हणून सांगू शकत नाही..मार खायची भीती वाटेनं म्हणून .. गुजराथी म्हणून सांगतात .. तुमची भाषणे करमणूकप्रधान असल्याने भारी वाटतात आणि ज्यांना मुळातच कामच करायचं नाही अशांना तर खूपच भारी वाटतात पण पोटासाठी आलेला एक माणूस (माणूस मुद्दाम म्हणतो कारण त्याची व्याख्याच तुम्हाला समजली नाहीये) इथ तुमचे टोले खाऊन स्वाभिमान गहाण ठेवून जगतो ..आज रिक्षा चालवायला , फळे विकायला गेलेला त्याचा बाप पाठीवर कोणत्या पक्षाचे वळ घेऊन येईल हे सांगता येत नाही .. युपी असो किंवा बिहारी असो किंवा आणखी कोणी .. भारतीय आहे .. पाठीवर मारा पण पोटावर मारू नका अशी एक म्हण आहे पण तुम्ही पाठीवर तर मारताच पण पोटावर सुद्धा मारता .. मी माझ्या महाराजांची शिकवण म्हणजे महाराष्ट्रात आलेला एक पण माणूस उपाशी झोपता कामा नये , कायम याला बांधील आहे ..जय महाराष्ट्र म्हणता मला पण येत पण तुमच्यात आमच्यात फरक आहे

? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ?