मुख्यमंत्र्यांचा मनाचा ‘ हा ‘ दिलदार पणा उद्धव ठाकरे लक्षात ठेवतील का ?

By | November 2, 2017

will shivsena remember this good faith work done by devendra fadanvis

शिवसेना व भाजप यांच्यात एकमेकांवर चिखलफेक केल्याशिवाय एकही दिवस जात नाही . सत्तेत सहभागी झाल्यापासूनच रोज एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत . मात्र हे सगळे बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उद्धव ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे.

कलानगर इथे मातोश्रीसमोर उभ्या राहणाऱ्या आलिशान आणि आठ मजली मातोश्री दोनच्या वाढीव बांधकामाला मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास विभागाने अखेर परवानगी दिली आहे. मातोश्री दोनच्या अतिरिक्त बांधकामासाठी परळ येथील एका एसआरए प्रकल्पाचा टीडीआर विकत घेण्यात आला होता. मात्र हा टीडीआर नियमानुसार मातोश्री दोनसाठी वापरता येणार नाही, असा शेरा देत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेने हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास विभागाकडे 16 सप्टेंबर रोजी पाठवले होते.

मात्र कोणतीही अडवणूक न करता, विशेष प्रकरण म्हणून मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी देऊन उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री दोनच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे. आठ मजली असलेल्या मातोश्री दोनच्या सहा मजल्यांचे काम पूर्ण झाले होते, आता मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यामुळे रखडलेल्या दोन मजल्यांचे कामही मार्गी लागणार आहे. नगरविकास खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती मातोश्री दोनच्या अतिरिक्त बांधकामाचे भवितव्य अवलंबून होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तव्यामुळे कलानगर इथला मातोश्री बंगला हा हे शिवसैनिकांचे आदराचे स्थान राहिले आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनंतर याच मातोश्रीवरून शिवसेनेची वाटचाल सुरू ठेवली.

ठाकरेंच्या वाढणाऱ्या कुटुंबाला मातोश्री कमी पडत असल्याने, मातोश्रीसमोरच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर 5200 चौरस फुटाचा बंगला विकत घेतला. हा बंगला पाडून या ठिकाणी आठ मजली इमारत उभी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मातोश्री दोनचे कामही सुरू झाले. मुंबई महापालिकेकडून सहा मजल्यांना सीसीही देण्यात आली आहे.मात्र हे बांधकाम ८ मजली करायचे होते .

या अतिरिक्त दोन मजल्यांना परवानगी मिळावी म्हणून, मे 2017 रोजी परळ येथील एका एसआरए प्रकल्पाचा टीडीआर विकत घेण्यात आला. मात्र हा 2600 चौरस फुटाचा टीडीआर नियमानुसार मातोश्री दोनसाठी वापरता येणार नाही, असा शेरा देत मुंबई महापालिकेने नगरविकास विभाग म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे पाठवले होते . आता मात्र सर्व काही सुरळीत झाले असून , मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यामुळे रखडलेल्या दोन मजल्यांचे कामही मार्गी लागणार आहे.

मुख्यमंत्रांच्या मनाचा दिलदार पणा उद्धव ठाकरे लक्षात ठेवतील का ? हे येत्या काळात दिसेलच .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?