प्रेमप्रकरणात अडथळा होत असल्याने प्रियकर व मामेभावाच्या मदतीने पतीला संपवले : महाराष्ट्रातील घटना

By | June 11, 2018

wife killed husband due to affair

आपल्या प्रेम प्रकरणात पती अडथळा ठरत असल्यामुळे पत्नी, पत्नीचा मामे भाऊ व प्रियकराच्या मदतीने पतीला संपविल्याचा धकादायक प्रकार अमरावतीही अंजनगाव तालुक्यातील कापूस्तळणी येथे घडली. रहिमापूर पोलिसांनी सोमवारी पत्नीसह प्रियकराला अटक केली असून, पत्नीच्या मामेभावास अटक करण्यात अजून यश आलेले नाही.

  • काय आहे प्रकरण ?

महेंद्र ईश्वरदास इंगळे (३५) असे दुर्दैवी पतीचे नाव असून, याची आरोपी पत्नी सोनाली महेंद्र इंगळे (३३) हिचे घराच्या बाजूला राहत असलेल्या सचिन हरिदास इंगळे (३१) चुलत दिरासोबत दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. याची कुणकुण पतीला लागली होती त्यावरून त्यांचे खटके उडत होते . मात्र शेवटी सोनालीने त्याला संपवण्याचाच निर्णय घेतला.मे महिन्यात मृत महेंद्र इंगळे रोजगार मिळण्याकरिता बाहेरगावी गेला होता. तो १९ मे रोजी परत आला व त्याच दिवशी महेंद्रचा त्याच्या राहत्या घरात पत्नी व चुलत भाऊ यांच्यासोबत वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने घरातील खलबता उचलून महेंद्रच्या डोक्यात घालण्यात आला त्यात तो जागीच ठार झाला. मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे घरातील अंगणात मोठा खड्डा खोदून त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरला.

मात्र , १० जून रोजी सकाळी या घटनेची कुणकुण रहिमापूरचे ठानेदार सचिन शिरसाठ यांना लागली. त्यांनी मृताच्या आईला आपल्या मुलाबाबत विचारणा केली असता, माझा मुलगा काही दिवसांपासून घरी नाही, असे सांगितले. तसेच माझ्या सुनेचे व घराशेजारच्या सचिन इंगळेसोबत अनैतिक संबंध असल्याचेही त्या म्हणाल्या. व यांनी माझ्या मुलाला मारून टाकले असेल, असेदेखील पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. त्यानंतर महेंद्रबाबत सचिन इंगळे यांना विचारणा केली असता आधी उड़वा उडवीची उतरे पोलिसांना मिळत होती. मात्र सचिन व सोनाली यांना रहिमापूर पोलीस ठाण्यात आणून पोलीस खाक्या दाखवाताच आम्हीच महेंद्र इंगळेचा खून केल्याची कबुली दिली. तसेच आमच्यासोबत सोनाली इंगळे हिचा मामेभाऊ सुनील रामकृष्ण तायडे (४२ ) हा देखील सहभागी होता असे सांगितले आहे . तिन्ही आरोपींवर भादंविच्या कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी स्वतःच्या पत्नी व बाळाची केली हत्या : महाराष्ट्रातील संतापजनक घटना

दोन मुलांची आई वीस वर्षीय बेरोजगार प्रियकराबरोबर झाली फरार : पोलिसांना केली ‘ ही ‘ मागणी

चार प्रियकरांच्या सोबत मिळून नवऱ्याला ठार करून गाठली क्रौर्याची परिसीमा : धक्कादायक बातमी

दोन्ही भावांनी बायकांना परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले : नकार देताच मिळाला तलाक

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

अश्लील चित्रफीत दाखवून मौलानाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

चुलत दिराकडून भावजयीवर तब्बल एक वर्षे अत्याचार : वाच्यता केल्यास द्यायचा ‘ ही ‘ धमकी

प्रेमविवाहासाठी धर्मांतर मात्र तरीही नव्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून :महाराष्ट्रातील घटना

अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही

पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणाला कंटाळून पतीची आत्महत्या : सुसाईड नोटमध्ये लिहले असे काही ?

अबब …३४ वर्षीय शिक्षिकेकडून १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण : शिक्षकी पेशाला काळिंबा

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा