दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने विवाहित महिलेने पहिल्या प्रियकराला संपवले : महाराष्ट्रातील घटना

By | December 29, 2017

married wife kills first boyfriend with help of second boyfriend thane case1

प्रेयसीने आपल्या पहिल्या प्रियकराचा काटा दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने काढला तर खरा मात्र तिला त्याला अपघाताचे स्वरूप द्यायचे होते, मात्र तसे झाले नाही आणि अखेर ह्या सर्व प्रकारचा भांडाफोड झाला. सध्या दोघेही अटकेत असून जेलची हवा खात आहे मात्र त्या दुर्दैवी पहिल्या प्रियकराला यात आपला प्राण मात्र गमवावा लागला आहे .

प्रेयसीने पहिल्या प्रियकराचा अपघात घडवून काटा काढल्याचा प्रकार ठाणे पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे उघडकीस आला. यात गंभीर जखमी झालेले रामजी शर्मा (वय 46) यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार , विवाहबाह्य संबंधामुळे हा प्रकार घडला असून रामजी शर्मा यांची प्रेयसी सुमारी यादव व तिचा दुसरा प्रियकर जयप्रकाश मंगरू चौहान सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत.

ठाणेमध्ये आझादनगर परिसरात सुमारी यादव या विवाहित महिलेशी मृत रामजी यांचे अनैतिक संबंध होते.त्यानंतर सुमारी यादव हिची परिसरातील टुरिस्ट कार चालवणाऱ्या जयप्रकाश मंगरू चौहान याच्याशी ओळख झाली. हळू हळू ह्या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले, मात्र ह्या प्रकरणाची कुणकुण पहिला प्रियकर रामजी यांना लागली व त्यावरून सुमारी यादव व रामजी यांच्यात खटके उडू लागले. अति झाल्यावर सुमारीने रामजीला संपवण्याचा निर्णय घेतला मात्र कसे संपवायचे याच्याबद्दल ती साशंक होती.मग तिने दुसऱ्या प्रियकराची म्हणजे जयप्रकाशची मदत घ्यायचे ठरवले.

पुढे दोघांनी कट रचला व 18 नोव्हेंबरला मॉर्निंग वॉकला गेलेल्या रामजी यांना ब्रह्मांड परिसरातील तुलसी हॉटेलसमोर भरधाव कारने उडवले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.पुढे त्यांना ह्या दोघांनीच मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल केले व कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी कारच्या धडकेत जखमी झाल्याचा गुन्हा नोंदवला. मात्र पोलिसांना ह्या प्रकारचा संशय आला व त्यांनी तपासचक्रे फिरवली. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील चेक केले. त्यात झालेली घटना पाहता तो अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला अपघात होता हे लक्षात आले. दरम्यान सुमारी व जयप्रकाश याचे मोबाईल लोकेशन देखील पोलीस चेक करत होते. २५ डिसेंबरला दोघांना ताब्यात घेण्यात आले व चौकशीदरम्यान जयप्रकाश याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रेयसीच्या सांगण्यावरून आपण हा अपघात घडवल्याचे त्याने सांगितले.

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?