अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

By | December 21, 2017

wife burns husband over extra marital affair in satara maharashtra

कित्येक वेळा सांगून देखील आपल्या पतीचे अनैतिक संबंध बंद होत नसल्याने शेवटी पत्नीने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याची घटना महाराष्ट्रात घडली आहे . ह्या इसमाचे बाहेर अनैतिक संबंध होते ज्यावरून यांच्यामध्ये कायम वाद होत होते. कित्येकदा सांगून देखील पती आपले ऐकत नाही याने ह्या महिलेचा संताप अनावर झाला व तिने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

हा प्रकार कोयना विभागातील अतिदुर्गम रिसवड (ता. पाटण,जि .सातारा ) भागात घडला असून बाळू संपत रोकडे (वय 44) असे जखमी पतीचे नाव आहे. तो 84 टक्के भाजला आहे. सीता (वय 37) असे पत्नीचे नाव आहे. रोकडेवर सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे पाटण तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसवड गावामधील बाळू संपत रोकडे याचे गावातील एका मुलीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याची पत्नी सौ. सीताला होता. याबद्दल तिने कित्येक वेळा आपल्या पतीची कानउघाडणी देखील केली होती. मात्र त्याच्या वर्तणुकीमध्ये काही बदल होत नव्हता. ह्या कारणावरून त्यांच्यात कायम भांडणे होत होती. अनैतिक संबंध बंद करण्यासंदर्भात खटके उडत होते. याकडे पती बाळू रोकडे दुर्लक्ष करत होता. मात्र त्याचे हे अफेअर सुरूच असल्याचा पत्नीला संशय होता. त्यातूनच घटना झाली त्या दिवशी सकाळी (२० डिसेंबर ) ला वाद झाला होता . साडेसातच्या सुमारास बाळू रोकडे घरात स्वयंपाकाच्या चुलीजवळ बसला होता. चिडून सीताने रागाच्या भरात “तू अनैतिक संबंध बंद कर,’ असे म्हणत बाळूच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले.

पेटवलेला बाळू तसाच बाहेर पळत सुटला. त्याने नातेवाईकांच्या घरी धाव घेतली. पेटलेल्या अवस्थेत त्याने मला पत्नीने पेटवून दिले आहे असे सांगितले. नातेवाईकांनी तात्काळ बाळूला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. येथे त्याच्यावरकाही प्रमाणात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र नंतर लगेचच त्याला सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?