नाशिकच्या सिडकोमधील ‘ ह्या ‘ लाल बाटल्यांचे रहस्य नक्की काय ?

By | November 30, 2017

why there are red bottles outside cidco homes nashik

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडून काही विशेष कारवाई होत नाही. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे देखील प्रयोग करून झाले मात्र त्यालाही महापालिकेला काही मर्यादा येतात . प्राणीमित्र संघटना लगेच ओरड सुरु करतात . मात्र रस्त्यावर बेवारस मारून पडलेले प्राण्यांचे मृतदेह उचलायच्या वेळी हे प्राणीमित्र बघायला सुद्धा येत नाहीत तसेच भटक्या कुत्रांकडून माणसावर हल्ले झाले तरी प्राणीमित्र गप्प बसून असतात . अशा परिस्थितीत लोकांना भटक्या कुत्र्यांचा जो त्रास होतोय यावर सामान्य नागरिकांनी करायचे तरी काय ? मात्र ह्यावर नाशिकच्या लोकांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. मात्र ह्याचा कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी काही प्रमाणात ही परिणामकारण ठरत असल्याने आणि याचा कोणाला त्रास होत नसल्याने सध्या नाशिककरांना कुत्र्यांच्या त्रासापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे असे म्हटले तरी चालेल.

सिडकोतील नागरिकांनी घरासमोर लाल रंगाचे पाणी बाटलीत ठेवून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही अंशी यश आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी ग्रामीण भागातून असे प्रयोग करण्यात आले होते . मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक नगरसेवक व महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगूनही काहीही पाऊल महापालिकेकडून उचलले जात नाही त्यामुळे नवीन नवीन कल्पना लढवून लोक आपल्या आपल्या पद्धतीने हा फॉर्मुला आजमावत आहेत.

सिडकोत भटक्या कुत्रांचा उपद्रव काही नवा नाही. दिवस म्हणू नको कि रात्र ही भटकी कुत्री अचानक अंगावर काय येतात आणि रात्री अपरात्री तर एकटा दुकटा माणूस चोरांपेक्षा ह्या कुत्र्यानं घाबरतो म्हटलं तरी चालेल. अनेक वेळा नगरसेवक तसेच महापालिकेत तक्रारी झाल्या मात्र ठोस कारवाई काहीच नाही . सिडकोच्या जवळच कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र असल्याने बाहेरून आणून निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांना सिडको परिसरातच सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा यासाठी महानगरपालिकासुद्धा हतबल झालेली आहे.

घरासमोर लाल रंगाचे पाणी असलेल्या बाटल्या ठेवून कुत्र्यांना अटकाव करण्याची शक्‍कल लढविली असल्याचे दिसत आहे. लाल कुंकू किंवा लाल रंगाचा वापर करून हे पाणी तयार करण्यात येत आहे. बिसलेरी च्या मोकळ्या बाटलीत हे रंगीत पाणी भरून ठेवले कि कुत्रे लांब पळून जातात असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. एकजनाने हा प्रकार करून बघितला, आणि बाकीच्यांनी सर्रास कॉपी केला. आता सिडकोतील बऱ्याच ठिकाणी या बाटल्या बघावयास मिळत आहेत. या बाटल्या पाहून कुत्रे पळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. एखादी नवीन वस्तू दिसल्यानंतर माणूसही त्या वस्तूला पाहून घाबरतो. त्याचप्रमाणे कुत्रेही त्या बाटल्या पाहून घाबरत असावेत, असा काहींचा कयास आहे.मात्र गंध ज्ञान कुत्राला माणसापेक्षा कित्येक पट जास्त असते, त्यामुळे हा फॉर्मुला कितपत चालतोय किंवा चालेल हे आजतरी आपण सांगू शकत नाही .

काही गुण रक्तातच : जाणून घ्या रक्तगटावरून तुमचा स्वभाव

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

उंदराच्या पॅडने ‘ अशी ‘ वाढवली प्राणिमित्रांची डोकेदुखी

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?