‘ ह्या ‘ आठ कारणामुळे भिकारडे मराठी सिनेमे मी बघत नाही

By | September 25, 2017

पोस्टचे टायटल वाचून दचकू नका .. मोठी पोस्ट आहे .. मन लावून वाचा

६ दिवस मान मोडून काम केल्यावर असं वाटत मस्त बायकोबरोबर एखादा चित्रपट पाहावा .. ३ तास तरी कामाच्या थकव्यामधून विरंगुळा मिळावा . एकदा कधीतरी मुहूर्त निघतो आणि बायकोला घेऊन आमची गाडी थिएटरच्या दारात ..

एका स्क्रीन वर असतो बद्री कि दुल्हनिया आणि दुसऱ्या स्क्रीन वर कोणता तरी एक मराठी चित्रपट ज्याचे नाव पण कधी ऐकलं नाही .. शेवटी मत विचारात घातलं जात ..आणि बद्री कि दुल्हनिया बघायला जातो .. मग मनात विचार येतो आपण तर मराठी आहोत मग जसे तेलगू लोक,तामिळ लोक त्यांचे त्यांचे सिनेमे पाहतात व चालवतात तसे आपण का नाही ? डोक्यात विचार सुरु होतात आणि एक एक गोष्टी लक्षात येत जातात

पहिली म्हणजे सिनेमाचा हिरो .. कुठे रजनीकांत त्याची ब्रँड इमेज आणि बाहुबलीचा प्रभास .. आणि कुठे आमचे मराठी हिरो … १० दिवस अंघोळ न करता शेजारच्या थोड्या सुशीक्षीत पोरीकड आशाळभूत नजरेनं पाहायचं आणि हिम्मत होत नाही म्हणून कुढत राहायचा .. आन दोष द्यायचा जातीला .. अशा दरिद्री हिरो ची गरिबी अन तो चिमणी लावून अभ्यास करतो का गोर बनाव म्हणून फेस क्रीम लावतो .. हे आम्ही एका प्रेक्षकानी पैसे घालून का बघावं ? नाते हे आर्थिक गणितावर पण थोड्या फार प्रमाणात अवलंबून असतात पण आमचा हिरो त्याचा जातीशी संबंध जोडतो अन एका समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो .. डायरेक्टर ला २-३ बाहुल्या मिळतात अवॉर्डच्या त्यो भी खुश .. हिरो ला असा पण कुणी घेतल नसत पिच्चर मधी .. त्यो भी खुश .. आणि तिकीट काढून गेलेला मात्र शिव्या घालतो अन बाहेर पडतो ..

दुसरी म्हणजे सिनेमाची स्टोरी .. मराठी सिनेमा आजच्या काळात कधीच चालत नाही .. कमीत कमी २० वर्षे मागे असतो .. आणि अचानक मधेच मोबाईल पण दिसतो बरका .. आम्हाला कर्मशियल स्टोरी चालत नाही .. आर्ट पाहिजे .. आम्ही समाजाला कायतरी एक मेसेज यातून देण्याचा प्रयन्त करत आहोत .. अहो पण लोक तिकीट काढून तुमचा मेसेज वाचायला येणार नाहीत.. इतका ऊत आहे तर एक एस.एम.एस. पॅक मारा अन पाठवत राहा मेसेज .. पिच्चर कशाला काढताय ? पदर ८०-१०० रुपये घालून तुमचा मेसेज कोण घेणार .. आणि तुम्हाला एवढ सिरियसली घ्यायला तुम्ही काय शेक्सपिअर आहात का ? मी तिकीट काढलाय माझं मनोरंजन करा आधी . बाकी मेसेज साठी सेपरेट भेटूयात एकदा ..

तिसरी गोष्ट म्हणजे जाहिरात .. मान्य आहे तुम्ही सिनेमा बनवला .. पण तो कुणासाठी ते तरी सांगा राव … बद्री कि दुल्हनिया निदान नाव तरी ऐकलंय .. ट्रेलर मधून थोडा इन्टेरेस्ट आलाय म्हणून तर आलोय पिक्चर बघायला .. तुमच्या सिनेमाचं नाव कधी ऐकलं नाही .. स्टोरी काय आहे .. कोण हिरो आहे ..कोण हिरॉईन आहे माहित नाही .. मग १०० रुपये तिकीटाचे ते तरी कशाला वाया घालवायचे .. फक्त मराठी आहे म्हणून ? कशाला रडक्या स्टोऱ्या बघायला का ? आपण कायतरी अल्लाउद्दीन चा दिवा बनवला आहे ..आणि त्याचे पोस्टर प्रोमो हे सर्व काही आम्ही कॉपी राईट प्रोटेक्ट केलेले आहे म्हणून ते असे कुठे पण शेअर झाले कि आम्ही त्याला कोर्ट, केस यांच्यात बंदिस्त करून ठेवणार .. हिंदी लोक प्रोमोशन ला लढतात आणि मराठी कॉपी राईट च्या नावाखाली रडत बसतात ..

चौथी गोष्ट म्हणजे समाजाला मेसेज देण्याचा अट्टाहास .. आपल्या सिनेमामधून समाजाला एक मेसेज दिला पाहिजे .. अरे समाज हुशार आहे भाऊ .. तू काय मेसेज देणार .. आणि सिनेमा मधून मेसेज द्यायचे दिवस गेले आता ..आता ५०० च्या पुढे टी.व्ही चॅनेल आहेत ..सरकार पण मेसेज पाठवत असते .. तू काय शिकवणार समाजाला आणि समाजाला शिकवायला तू काय सोसायटीचा मॉनिटर आहे का टीचर आहे ..?

पाचवी गोष्ट राहिला अभिनयाचा … अभिनय कशाशी खातात याचा कसलाही अनुभव नसलेले लोक केवळ प्रोड्युसर च्या वशिल्याने मराठी सिनेमात जोडले जातात . .. काम मिळत पण अभिनयात काय प्रगती होत नाही .. देखणा असो व नसो तरी अभिनय शून्य असा चेहरा एक कॅलेंडर च्या रूपात आम्ही प्रेक्षकानी कसा तो सहन करायचा ? .. प्रोड्युसर आणि तुमचे संबध जवळचे असोत व नसोत पण अशी कॅलेन्डर आम्ही पदरमोड का सहन करायची ? आणि तुमचे तोंडपाठ झालेले डायलॉग रट्टा मारल्यासारखे का ऐकून घ्यायचे ?

सहावी गोष्ट गाणी .. चित्रपटात गाणी पाहिजेत ,पण कशी हो ? बायकोला घेऊन सिनेमा बघायला जाणारा माणूस .. त्याला लावणीच्या घायाळ अदा पोपट, चिमणी, ( अर्थात लावणी ही स्टोरीची गरज नसेल तर पण तुम्ही बळेच लावणी घुसडवता ..कारण आपला सिनेमा मराठी आहे .. लावणीशिवाय कसा होणार .. हे तुमचे सुमार लॉजिक ) , डबल मिनिंग असलेली पांचट गाणी नाहीच हे जमले तर महाराजांवर एक पोवाडा बनवायचा … महाराजांचा असा वापर करून पण तुमचे सिनेमा बघायला कुत्र पण फिरकत नाही ही गोष्ट वेगळी ..

सातवी गोष्ट चित्रपटाचे नाव… आता किंवा गेल्या ३-४ वर्षात तयार झालेल्या मराठी चित्रपटाची नावे पहा .. नाव ऐकूनच चित्रपट गृहात पाऊल ठेवायचे थोडासा होणार नाही .. कुणावर वैयक्तिक राग नाही .. पण बघा .. साधारण पॅटर्न असा असतो …टिचकुल्या, झिपऱ्या, भिकाऱ्या, उसुंस, गर्भगृह , सुरतु, मुर्त्यू , कुतरु.. तुमची कलात्मकता ह्या नावामध्येच आम्ही समजून घेतली आहे.. उरली सुरली कसर तुमच्या सिनेमाच्या पोस्टर ने भरून काढली .. टकला आणि ढेरपोट्या हिरो .. आणि त्यातली त्यात अभिनय शून्य असेल तरीही पोस्टरवर सुंदर दिसण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी अभिनेत्री .. आपला ढेरपोट्या हिरो २० वर्षाच्या पोरीसोबत चावट चाळे करतो ते बघताना कला नाही पण विकृती जास्त दिसते .

आठवी गोष्ट मराठी चित्रपटाचा काळ .. साधारण २० वर्ष जुनी स्टोरी. जातीयवाद आणि पाटलाचे धूर्त राजकारण याने परिपूर्ण अशी .. गावठी अश्शील संभाषण .. टॉयलेटला डबा घेऊन जाताना बायकांचे संभाषण .. मधेच कोणतरी मोबाईल वर बोलतो आणि सिनेमा सुटल्यावर काळ तर २० वर्षे पूर्वीचा होता मग यांच्याकडे मोबाईल कसा आला असे अनेक प्रश्न घेऊन आपण बाहेर पडतो .. सुरवातीला मस्त माज दाखवणारा हिरो पुढे एकदम गप्प का होतो .. हा अचानक असा का वागतो ? असे अनेक प्रश्नचिन्ह मराठी सिनेमा पाहून झाला कि उपस्थित होतात ..

###मनात आलाय म्हणून लिहलंय .. कोणावर वैयक्तिक राग नाही .. अर्थात याने काय बदल होईल असा नाहीये ..कारण झोपलेल्याला जाग करता येत, पण झोपल्याचे सोंग घेतलं तर त्याला कसा जाग करायचं ? पिढयान पिढ्या आम्ही डोळ्यावर व्यवहारशून्य असल्याचा रुमाल बांधून घेतला आहे.. आणि आमच्या मेंदूतील अज्ञान आम्ही उघडे पडू नये म्हणून कला,आसक्ती या गोंडस नावाखाली त्याला झाकायचा प्रयन्त करतोय .. म्हणूनच मराठी माणसाने मराठी सिनेमा पाहिला पाहिजे हे सांगायची वेळ येतेय .. मराठी माणसाचे मराठीवर प्रेम आहे पण मराठीच्या नावाखाली त्याचा खिसा कापू लागलात तर तुम्हाला कधीच यश येणार नाही ..

जय महाराष्ट्र

?? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा .. पोस्ट माझी असेल तरी पण तुमच्या नावाने बिनधास्त शेअर करा .. कॉपीराईट नाही .. कोण शेअर करतोय यापेक्षा काय शेअर करताय हे महत्वाचं आहे ??