रेशमचा ‘ संदेश ‘ कोण याचा झाला उलगडा : राजेश रेशमच्या जवळीकीबद्दल संदेशने सोडले मौन

By | June 17, 2018

we shall sleep in same bed resham tipnis rajesh shrungarpure

बिग बॉसच्या घरातील सदस्य राजेश श्रुंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली. आजपासून आम्ही एकाच बिछान्यात झोपणार ,पासून रंगलेली चर्चा राजेश शृंगारपुरे याच्या बाहेर जाण्याने थांबली मात्र या नात्याबाबत रेशमचा प्रियकर संदेश किर्तीकरने आता मौन सोडले आहे . शोमध्ये रेशम आणि राजेशला जवळ येताना पाहून मला प्रचंड वाईट वाटलं, असं म्हणत त्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांच्या कुटुंबातील सदस्यांनी येऊन त्यांना सरप्राइज दिलं. रेशम टिपणीसची मुलगीदेखील यावेळी घरात आली होती. त्यानंतर एका भागात रेशमनं आपल्याला संदेशची आठवण येत असल्याचं कबूल केले. मुलीसोबत संदेशनेदेखील मला भेटायला यायला पाहिजे होते, ही एक चांगली संधी होती जी त्यानं गमावली अशी खंतही तिनं कॅमेऱ्यासमोर व्यक्त केली होती त्यानंतर हा संदेश कोण हा एक प्रश्न तमाम प्रेक्षकांना पडला होता.संदेश किर्तीकर हा रेशमचा प्रियकर असून रेशम आणि संदेश गेली दोन – अडीच वर्ष एकमेकांसोबत आहेत.

रेशम आणि त्याच्या नात्याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना संदेश म्हणाला, ‘ मी आणि रेशम गेली तीन वर्ष एकमेकांसोबत आहोत. आमचं एकमेकांवर प्रेम आहे . अडीच वर्षांपासून आम्ही डेट करतोय. परंतु, लग्नाचा विचार आम्ही अजून केलेला नाही.’ राजेश आणि रेशमच्या नात्याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाली की मला राजेश आणि रेशमला जवळ येताना पाहून प्रचंड वाईट वाटले. परंतु, बिग बॉस एक गेम आहे आणि त्या दोघांना गेमसाठी असं वागायला सांगण्यात आलं होतं किंवा नाही याची मला माहिती नाही. परंतु, सुरूवातीला मला त्रास झाल्यावर मी इंडस्ट्रीतील काही लोकांशी याबाबत बोललो, त्यांनी माझ्या बऱ्याच शंकाचं निरसन केलं. हा फक्त खेळ असल्याचं माझ्या लक्षात आलं.’ असे देखील संदेश पुढे म्हणाला.

रेशमला भेटायला बिग बॉसच्या घरात का गेला नाही, ह्या प्रश्नावर बोलताना संदेश म्हणाला, ‘ मला बिग बॉसकडून शोमध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आमंत्रण मिळाले नव्हते. मग मी कसा जाऊ शकतो? शेवटी घरात कोणी जायचं हा निर्णय शोच्या निर्मात्यांचा असतो. आणि मला माझे प्रेमसंबंध खासगी राहावे असे वाटते. त्यामुळे मी तिथे गेलोही नसतो, असे देखील त्याने स्पष्ट केले .