कोरेगाव भीमाच्या हिंसाचारामागील अदृश्य हात कुणाचे ? : तपास यंत्रणांचा काय अंदाज

By | January 4, 2018

who is behind koregaon bheema violence what investigation agency says

सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भीमा कोरेगावच्या झालेल्या प्रकारात आणि त्यानंतर महाराष्ट्रभर झालेल्या हिंसाचारात नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.दलित विरुद्ध दलितेतर हा वाद उफाळून आणून संपूर्ण महाराष्ट्र धुमसत ठेवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता . नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन केले होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने वृत्त दिले आहे. वाद निर्माण करुन व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दलित संघटनांच्या आंदोलनाचं लोण पसरावं, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे म्हटलं जात आहे. भीमा कोरेगावातील हिंसाचार घडण्याच्या बरोबर एक दिवसापूर्वी नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशनची बैठक झाली होती, त्यातील काही सीलबंद करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी हा निष्कर्ष काढला आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या रिपोर्ट्सनुसार 31 डिसेंबर 2017 ला जिग्नेश मेवाणी आणि उमर खालेद यांनी भाषण केलेल्या एल्गार परिषदेमध्ये सहभागी लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. ह्या आंदोलनामध्ये लोकशाहीच्या आडून नक्षलवादी प्रवेश करतात व लोकशाहीतील व्यवस्थेत राहूनच दंगलीचे स्वरूप देत असा हिंसाचार घडवून आणतात .अशा घटना याआधी देखील इतर राज्यांमध्ये घडल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून डावे उजवे आणि तत्सम नावानी ह्या संघटना लोकशाहीच्या आडून चालवल्या जातात. संघटनेचे लोक हे दलित आणि मुस्लिम बांधवांमध्ये जाऊन त्यांचे सरकारच्या विरोधात प्रबोधन करतात आणि हळू हळू त्यांना हिंसेसाठी प्रवृत्त करतात . बहुतांश दलित व मुस्लिम जे बेरोजगार आहेत,त्यांना ही समाजव्यवस्था किंवा जाती व्यवस्थेमुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे .आता न्याय हवा असेल तर तुम्हाला लढा दिलाच पाहिजे. त्यासाठी लोकशाही आता नको असे करत त्यांचे ब्रेनवॉश केले जाते ,आणि अशी काही घटना आली कि त्यातून हिंसाचार घडवून दंगलीचे स्वरूप देत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले जाते . दंगलीत सहभागी असलेल्या व्यक्तींना देखील आपण लोकशाहीच्या विरोधात लढत आहोत, पर्यायाने आपल्या देशाच्याच विरोधात लढत आहोत याचे भान राहत नाही.आणि आपण नक्षलींना साथ देत आहोत हे कळत देखील नाही. जातीवर अन्याय झालाय म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय हाच त्यांचा अजेन्डा ते लोकांना पटवत राहतात. मात्र नक्षली इथवर थांबत नाहीत, दंगल घडवून सुद्धा आपल्यावरच कसा अन्याय झालाय हे दंगलीचे फोटो व्हिडिओ दाखवत समाजात आणखी सहानभूती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. जातीय हिंसाचारासाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवून मोकळे होतात . दरम्यान ,हिंसक आंदोलनामागे नक्षलवादी संघटनांच्या भूमिकेची कसून चौकशी करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले आहे .

31 डिसेंबर 2017 ला जिग्नेश व उमर खालेद च्या भाषणामध्ये देखील नवी पेशवाई व जातीय पद्धतीचा खूप द्वेषपूर्ण असा वापर करून लोकांना चिथावण्यात आले होते. त्याचा देखील परिणाम आपल्याला ह्या हिंसाचारामध्ये दिसून आला. त्याबद्दल जिग्नेश मेवाणी व उमर खालेद यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे .

  • प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय वजन वाढले आणि शिवसेनेला मिळाली आयती संधी

दिवसभर हिंसाचाराचे अराजक महाराष्ट्राला पाहायला मिळाल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतल्याची घोषणा केली. अर्थात ह्या दंगलीसाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार ठरवायला ते विसरले नाहीत. प्रकाश आंबेडकर यांची यापूर्वीची भाषणे पहिली तर कायम विधायक आणि मुद्देसूद अशी ही भाषणे असायची मात्र कालचे प्रकाश आंबेडकर यांचे कालचे वर्तन त्यांच्या यापूर्वीच्या भाषणांशी सुसंगत वाटत नव्हते. रिपब्लिक चैनलवर बोलताना देखील आंबेडकर हे प्रचंड दबावाखाली दिसत होते. भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून आंबेडकर यांनी डाव्या व पुरोगामी संघटनांना सोबत घेऊन सरकारविरोधी भूमिका तीव्र करत त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत, मात्र आता जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असे बोलणारे आंबेडकर काल आपल्याला पाहायला मिळाले.

ह्या बंदमध्ये नागपूरला रामदास आठवले यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच मुंबईमध्ये चेंबूर येथील लाल डोंगर, चेंबूर नाका, वाशी नाका, विक्रोळी एलबीएस या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाचे फळे, फलक मोठ्या प्रमाणावर लावलेले दिसले, तसेच कार्यकर्ते आंबेडकर यांच्या बाजूने घोषणा देतानाही दिसत होते.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व अधोरेखित झाले असून, राज्याच्या राजकारणातील त्यांचे वजन वाढण्यास मदत झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर आठवले सत्तेत असून देखील बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळाले . बंदमुळे मात्र मुंबईसह, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही आंबेडकर यांच्याबद्दल आंबेडकरी जनतेमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान ह्या बंदमुळे शिवसेनेला देखील भाजपवर टीका करायची आयती संधी चालून आली, सरकारने आता तरी निवडणुकांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवावे, जमिनीवर यावे. शिवसेनेशी लढायला सारे जीवन आहे. शिवसेनेस राजकारणातून खतम करण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा. राज्य पेटले आहे. ती शेकोटी एक दिवस तुम्हालाही खाक करील, अशा शब्दात शिवसेनेकडून हे निमित्त साधून मुख्यमंत्र्याना टार्गेट केले गेले. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना देखील दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये, असे सामनामधून सांगण्यात आले.

जे झाले हे अत्यंत दुर्दैवी होते .. देव करो आणि महाराष्ट्राला परत असा काळा दिवस पाहण्याची वेळ न येवो .

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

अखेर मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणावर नाव न घेता केला ‘ ह्यांचे ‘ कडे इशारा

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा