जेव्हा महाराष्ट्र पोलीस चक्क चप्पलचोरीचा गुन्हा दाखल करून घेतात

By | October 10, 2017

pune police files fir for missing slippers

चोरी झाल्यावर आपण पहिली धाव घेतो ती पोलीस स्टेशनला … पण जर कोणी चप्पल चोरी झाली म्हणून पोलीस स्टेशनला गेले तर ? आहे ना अफलातून .. मग चप्पल चोरीसारख्या किरकोळ गुन्हांची पोलीस तक्रार नोंदवून घेतील आणि त्याची चौकशी देखील सुरु करतील यावर लेखी देऊन सुद्धा कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, अशी खरोखर घटना पुणे जिल्ह्यात अशी घटना घडली आहे. हिंदुस्तान टाईम्सने पीटीआयच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.मोठे गुन्हे घडल्यावर देखील चौकशा करून गुन्हे दाखल करण्याऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांनी चप्पल चोरीच्या या अपवादात्मक गुन्ह्याला गांभीर्याने घेत पुढे तपास देखील सुरु केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विशाल काळेकर (वय ३६, रा. रक्षेवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी आपल्या घराबाहेरुन नवी कोरी चप्पल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी आयपीसी ३७९ अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याची चौकशी सुरु असल्याचे पोलिस निरिक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणालाही याप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही.

तक्रारदार देणारे श्री. काळेकर हे खेड तालुक्यातील टाकळकरवाडी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतात. ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ३ ते सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान ही चप्पल चोरीची घटना घडली असे काळेकर यांचे म्हणणे आहे. काही अज्ञात लोक या वेळेत अपार्टमेंटमध्ये घुसले आणि त्यांनी विशाल यांनी ४२५ रुपये किंमतीची काळ्या रंगाची चप्पल चोरून नेली. त्यानंतर काळेकर तक्रार हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. विशेष म्हणजे अंमलदार वाय. एम. गायकवाड यांनी त्यांची तक्रारही दाखल करून घेतली आणि तपासाला सुरुवात केल्याचे समजते .

? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ?