गुड न्यूज :व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी ‘ ही ‘ गोड बातमी

By | December 3, 2017

whatsapp group admin will get additional rights version 2 17 430

व्हॉटसअॅपचा ग्रुप अॅडमिन हा आजवर चेष्टेचाच विषय राहिला आहे मात्र आता यापुढे व्हॉटसअॅपने जरा ऍडमिनकडे मानवतेच्या भावनेतून लक्ष द्यायचे ठरवलेले दिसत आहे . ग्रुप मध्ये धर्म जात यावर पोस्ट कोणी जरी टाकली तरी जबाबदार ऍडमिनच असा कायदा देखील करण्यात आला आहे. अर्थात पोस्ट कोणीही केली तरी त्यास्तही ऍडमिनलाच जबाबदार ठरवले जाणे हे देखील अन्यायकारकच आहे. मात्र आता व्हॉटसअॅप ऍडमिन कडे ग्रुप संदर्भात आणखी अधिकार देण्यात येणार असल्याचे समजते .

ग्रूपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल.व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 नवीन आवृत्ती मध्ये अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो. अशावेळी तो व्यक्ती ग्रूपमध्ये केवळ मेसेज वाचू शकतो. पण कोणत्याच मेसेजला रिप्लाय करु शकत नाही. अर्थात कॉपी पेस्ट आणि आला कि कर फॉरवर्ड ह्या दुर्गुणांना काही प्रमाणात आळा घालण्याचे ऍडमिन ला अधिकार मिळतील ही चांगली गोष्ट आहे. ग्रुप मध्ये त्रास देणे किंवा सतत कॉपी पेस्ट करत राहणे , ग्रुप मधून काढले कि राग येणे असे प्रकार याआधी देखील झालेले आहेत .

WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये हे सर्व फिचर आलेलं आहेत. नवीन व्हर्जन अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्हीमध्ये उपलब्ध असेल “Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल आणि अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो. अशावेळी तो व्यक्ती ग्रूपमध्ये केवळ मेसेज वाचू शकतो. पण कोणत्याच मेसेजला रिप्लाय करु शकत नाही. पोस्ट करायचे असेल तर बंदी घातलेल्या ग्रूपमधील सदस्याला ‘मेसेज अॅडमिन’ या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल, जर ऍडमिन ने त्याचे ऐकले तरच त्या व्यक्तीस ग्रुप मध्ये पोस्ट करता येईल.

ग्रूपमधील कोणते सदस्य ग्रुपचं नाव आणि आयकॉन बदलू शकतात, हे आता ग्रूप तयार केलेला अॅडमिन ठरवू शकेल, असं ऑक्टोबर मध्ये आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.सोबतच आणखी काही छान छान फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येईल अशी आपण आशा करूयात.

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

डेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता

‘ ह्या ‘ पद्धतीने ओळखा सरकारी नोकरीसाठी आलेली फसवी जाहिरात

आणि ‘ म्हणून ‘ त्याने ट्विटरवर चक्क डोनाल्ड ट्रंप यांचे अकाउंट बंद केले

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?