गुड न्यूज :व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी ‘ ही ‘ गोड बातमी

By | January 13, 2018

whatsapp group admin will get additional rights version 2 17 430

व्हॉटसअॅप चा ग्रुप अॅडमिन हा आजवर चेष्टेचाच विषय राहिला आहे मात्र आता यापुढे व्हॉटसअॅपने जरा ऍडमिनकडे मानवतेच्या भावनेतून लक्ष द्यायचे ठरवलेले दिसत आहे . ग्रुप मध्ये धर्म जात यावर पोस्ट कोणी जरी टाकली तरी जबाबदार ऍडमिनच असा कायदा देखील करण्यात आला आहे. अर्थात पोस्ट कोणीही केली तरी त्यासाठीही ऍडमिनलाच जबाबदार ठरवले जाणे हे देखील अन्यायकारकच आहे. मात्र आता व्हॉटसअॅप ऍडमिन कडे ग्रुप संदर्भात आणखी अधिकार देण्यात येणार असल्याचे समजते .

कुटुंबियांपासून ते ऑफिस कलिगपर्यंत अनेकांचे आणि अनेक प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असतात.जर आपण असा एखादा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीही आनंददायी होऊ शकते . गेल्या काही दिवसांपासून ‘इंस्टाग्राम स्टोरीज’, ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स’ असे अनेक फीचर्स गेल्या काही दिवसांमध्ये अपडेट करण्यात आले आहेत.फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व इंस्टाग्राम हे सर्व एकाच कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत .

बंद झालेली तुमची लाडकी सोशल मीडिया वेबसाईट ‘ ह्या ‘ नावाने येणार परत

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

फेसबुकवर देखील आता यापुढे स्पॅम कंट्रोल किंवा न्यूज फीड मध्ये महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत . लाईक करा, शेअर करा . टॅग करा अशा जबरदस्तीला आळा घालण्याच्या दृष्टीने हे सर्व बदल करण्यात येणार आहेत . या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप मध्ये देखील आणखी बदल करण्यात येणार आहेत . व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन बटनासाठी टेस्टिंग करत आहे. त्यात आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चा ऍडमिन दुसऱ्या ऍडमिन ला ‘डिमोट’ किंवा ‘डिस्मिस’ करू शकेल जेणेकरून तो दुसरा ऍडमिन सदस्य तर राहील मात्र त्याच्याकडे ग्रुपची पॉवर राहणार नाही .

व्हॉट्स अ‍ॅपचे हे फीचर अ‍ॅन्ड्रॉईड बीटा वी 2.18.12 आणि आईओएस अ‍ॅपवर टेस्ट करण्यात येणार आहे. ‘नव्या अपडेटनुसार, ग्रुपमध्ये ‘ग्रुप इन्फो’ सेक्शनमध्ये तुम्हांला डिस्मिस करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या पर्यायानुसार, कोणालाही डिस्मिस न करता त्याच्याकडील पॉवर कमी केली जाऊ शकते. ‘Dismiss As Admin’ हा ऑप्शन ग्रुप इंफोमध्ये देण्यात आली आहे. अद्याप हे गुगलच्या प्ले स्टोअर ला उपलब्ध नाही मात्र लवकरच डाऊनलोड साठी उपलब्ध होईल.

त्यामुळे ऍडमिन लोकांबद्दल देखील फेसबुक विचार करतेय असे समजायला हरकत नाही

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

‘ ह्या ‘ पद्धतीने ओळखा सरकारी नोकरीसाठी आलेली फसवी जाहिरात

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा