गुजरातच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘ जळजळीत ‘ प्रतिक्रिया

By | December 19, 2017

shivsena blames bjp for incoming of patidar leaders in gujarat

सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे ,अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरातच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

१८२ जागांसाठी लढल्या गेलेल्या गुजरात निवडणूकीत ९९ जागांवर भाजपा तर ८० जागांपर्यंत काँग्रेसने मजल मारली. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत तर आहे मात्र आजकाल राहुल गांधी यांच्या बाजूने बोलताना दिसत आहे . शत्रूचा शत्रू आपला मित्र ह्या न्यायाने गेल्या काही दिवसापासून शिवसेनेने राहुल गांधी यांना उचलून घेतले आहे असे म्हटल्यास नवल वाटू नये . गुजरातच्या निकाला नंतर देखील अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आल्या.

याबद्दल अधिक बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा असून गुजरातचे मॉडेल डळमळले आहे. गुजरात व हिमाचलात भाजपचा विजय झाला, हा विजय होणारच होता. पण चर्चा मात्र गांधी यांचीच झाल्याचे उद्धव म्हणाले. भाजपा जिंकली तरीही काँग्रेसचाही पराभव झाला नाही व काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण झाले नाही.गुजरातेत भाजपला १५० पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही असे शेवटपर्यंत छातीठोकपणे सांगितले गेले. पण शंभराचाही आकडा गाठताना दमछाक झाली होती.

वारे बदलले नाहीत हे खरे, पण वारे मंदावले आहेत. उसळलेल्या लाटा थंडावल्या आहेत. अत्यंत परखडपणे बोलायचे तर, भाजप नेतृत्वासमोर राहुल गांधी, हार्दिक पटेल ही तर माकडेच आहेत अशा वल्गना आता मोडीत निघाल्या आहेत . सत्तेच्या माध्यमातून ‘शक्तिमान’ असलेल्या भाजपला या पोरांनी जेमतेम शंभरीपर्यंत रोखले हा एकप्रकारे विजयच असल्याचे सांगत उद्धव पुढे म्हणाले.

२२ वर्षांत गुजरातमध्ये भाजपने केला म्हणजे नक्की काय केले ? ह्या विषयावर प्रचारामध्ये कोणी काही बोलले नाही, मात्र केवळ पंतप्रधान गुजराती जनतेला भावनिक व अस्मितेची आवाहने करीत राहिले.पुढे वातावरण विरोधात जाताना दिसताच पाकिस्तान आणि हिंदू-मुसलमान हे मुद्दे जोरात प्रचारात आणले गेले, हार्दिकला ‘नग्न’ दाखविणारी सीडी भाजपने समोर आणून प्रचाराची पातळी खालावल्याची टीका उद्धव यांनी केली आहे.

अर्थात गुजरातमध्ये उभ्या केलेल्या आपल्या वाघांचे काय झाले हे त्यांनी सांगितले नाही तसेच भाजपाची सीट जरी कमी आली असली तरी मतांची टक्केवारी पूर्वीपेक्षा वाढली आहे, ह्या गोष्टींबद्दल सोयीस्कर बोलण्याचे टाळले.

रमेशभाऊंची गोल्डमॅन स्टाईल कॉपी करणाऱ्या शिवसेनेच्या गुजरातच्या उमेदवाराचे काय झाले ?

मोदींची जादू कायम : गुजरातमध्ये भाजपच तर हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस सत्ता गमावणार

मी चहा विकला पण ………. : मोदी काँग्रेसवर भडकले

नरेंद्र मोदींची चामडी सोलून काढू : ‘ ह्या ‘ नेत्याचे धक्कादायक विधान

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?