जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

By | November 18, 2017

what sunny leone says about meetoo campaign for females

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल महिला आता आवाज उठवू लागल्या आहेत .या बद्दल अनेक महिलांनी याच्या विरोधात आवाज उठवला आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्री देखील याच्या विरोधात पुढे आल्या आहेत . मात्र आता आवाज उठवला आहे सनी लिओनीने . सनी लिओनी याआधी पॉर्नस्टार होती आणि तिचे याबद्दल मत जाणून घेण्यात सर्वानाच उत्सुकता होती, मात्र ह्या विषयावर बोलणे अद्याप पर्यंत सनीने टाळले होते.

सनीने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉम’ला सनीने नुकतीच एक मुलाखत दिली.त्यात सनी लिओनीने लैंगिक शोषणाबाबत आणि या शोषणाला बळी पडलेल्या पीडितांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मात्र केवळ महिलांचेच शोषण होते, ह्या मताशी सनी सहमत नाही. सनी म्हणाली, ‘कामाच्या ठिकाणी केवळ महिलांचेच लैंगिक शेषण होते असे नाही. तर, अनेकदा पुरूषांचेही लैंगिक शोषण होते. अनेक ठिकाणी ही सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. पण, हे अत्याचार कोणीही खपवून घेऊ नयेत. आपल्यासोबत झालेल्या चुकीच्या प्रकाराबद्दल प्रत्येकाने दाद मागायला हवी. जोपर्यंत आपण असे करत नाही तोपर्यंत गोष्टी कधीच बदलणार नाहीत.’

सनी लिओनी ११ वर्षाची असताना कुटूंबियांसोबत ती यूएसला स्थलांतरीत झाली. सनीचे वडील इंजिनियर होते. तर आई घरगुती गृहिणी. सनीला एक भाऊ असून, त्याचे नाव संदीप सिंह वोहरा असे आहे. सध्या तो अमेरिकेत शेफचे काम करतो. सनी लिओनीला पॉर्न इंडस्ट्रीने प्रसिद्धी पैसा आणि ग्लॅमर मिळवून दिले असले तरी, सनीला मात्र कधीच पॉर्नस्टार व्हायचे नव्हते तर तिला मेडिकल मध्ये करिअर करायचे होते .

पॉर्नस्टार होण्यापूर्वीही सनी नर्सींगचेच शिक्षण घेत होती. सनीने वयाच्या 19व्या वर्षातच स्वत:च्या मर्जीने अॅडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश केला. एडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वी सनी ही अत्यंत सामान्य मुलगी होती. मात्र, एडल्ट इंडस्ट्रीने तिचे सामान्यपण ग्लॅमरमध्ये बदलवलं. पुढे सनी डॅनियल च्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केले. आजकाल दोघेही भारतात सोबत असतात आणि सनीचा पती देखील चित्रपटाच्या सेटवर कायम सनीच्या सोबतच असतो. अर्थात कायम सनीच्या सोबत राहण्यासाठी सुद्धा एक छान कारण आहे .

का असतो सनी लिओनीचा पती कायम सनीच्या सोबत

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?